HW News Marathi
राजकारण

महिलांचे रक्षण हीच आमची संस्कृती | ठाकरे

विनयभंग, व्यभिचार, बलात्कार या विकृतीला समाजात स्थान असूच नये आणि त्यास कुठली कवचकुंडलेही लाभू नयेत. पुरुषप्रधान संस्कृतीचे समर्थन कुणीही करणार नाही, पण पुरुषप्रधान संस्कृती नष्ट करताना नव्या विकृत संस्कृतीचा उदय होणार असेल तर तो धोकाही रोखायला हवा. ‘मी टूचे प्रकरण हे गैरवापराचे हत्यार बनू नये. महिलांचे रक्षण हीच आमची संस्कृती आहे. ती आपण जपलीच पाहिजे. असे मत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

हिंदुस्थानात कधी कोणत्या विषयाची वावटळ निर्माण होईल व त्या वावटळीत भलेभले कसे गटांगळय़ा खातील याचा नेम नाही. पुन्हा अशा सर्व प्रकरणांत देशाची बदनामी होते याचा विचार कुणीच करीत नाही. दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड झाले. त्यानंतर देशातील अनेक बलात्कारांच्या घटनांना अशी प्रसिद्धी मिळू लागली की, दिल्ली ही बलात्काराची राजधानी म्हणून बदनाम झाली. आता ‘मी टू’ची वावटळ उठली आहे. वावटळीचे रूपांतर वणव्यात झाले असून नाटक, साहित्य, पत्रकारिता, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांतील दिग्गज मंडळींवर विनयभंगाचे व लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱया महिलांनी पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकरांपासून सुरू झालेले ‘मी टू’ प्रकरण केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यापर्यंत पोहोचले आहे व ही सर्व प्रकरणे देश-विदेशातील लोक मिटक्या मारीत चघळत आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत देशाच्या साहित्य, संस्कृती, कला व राजकारणात चांगले काही घडलेच नाही व येथे फक्त हैवानशाहीचेच राज्य होते असे एक चित्र निर्माण झाले आहे. अर्थात हे चित्र बदलण्याचे काम आता या प्रकरणातील ‘संशयितां’नाच करावे लागणार आहे. महिलांच्या बाबतीत होणारे गैरवर्तन हा सर्वच दृष्टिकोनातून गंभीर विषय आहे. हे रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असले तरी समाजानेही महिलांबाबतचे कोणतेही गैरवर्तन खपवून घेऊ नये. वास्तविक, आपल्या समाजात स्त्रीाrला देवी, माता असे संबोधले जाते. तरीही

स्त्री अत्याचाराच्या घटना

घडतात आणि ‘मी टू’सारख्या मोहिमांमधून त्याच्या कहाण्या बाहेर येतात हे दुर्दैवी आहे. अर्थात ज्या स्त्रीयांनी आता ‘मी टू’च्या लाटेवर स्वार होऊन तक्रारी केल्या आहेत त्या कोणी गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱया अडाणी स्त्रीया नाहीत. त्यांना कायद्याचे ज्ञान होतेच; पण त्यांच्याबाबतीत घटना घडल्यावर पाच, दहा, पंधरा वर्षांनी त्यांनी ही सर्व प्रकरणे पुढे आणली आहेत. वास्तविक, गैरवर्तनाचे प्रकार त्या क्षणीच पुढे आणायला हवेत. तनुश्री दत्ता, प्रिया रामाणी, नवनीत निशान, विनिता नंदा या प्रतिष्ठत महिलांनी ‘मी टू’मध्ये सामील होऊन नाना पाटेकर, एम. जे. अकबर, आलोकनाथ, वरुण ग्रोवर, विकास बहल अशा लोकांवर हे आरोप केले. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही तिच्याशी गैरवर्तन झाल्याचे म्हटले. यातील अनेकांना सरकारने ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी विचार करावा अशी ही प्रकरणे आहेत. पडद्यावर, वृत्तपत्रांत नैतिकतेच्या भूमिका वठवणाऱयांवर हे आरोप झाले आहेत. आलोकनाथ यांनी आता सांगितले आहे की, ‘विनिता नंदावर बलात्कार झाला असेल हे मी नाकारत नाही, पण तो बलात्कार मी केलेला नाही.’ सध्या फक्त महिलांचीच बाजू ऐकली जाते, पुरुषांची बाजू कोणीच ऐकत नाही, असे आलोकनाथ सांगतात. कदाचित एम. जे. अकबर, विकास बहल यांचेही हेच म्हणणे असावे. भाजपचे दिल्लीतील खासदार उदित राज यांनी तर

क्रांतिकारकवक्तव्य

केल्याचे दिसते. त्यांचे सांगणे असे की, ‘अशा प्रकारचे घाणेरडे आरोप लावण्यासाठी महिला पैसे घेतात. कुणाच्या तरी सांगण्यावरून त्या इतर पुरुषांना लक्ष्य करतात. सर्व महिला परफेक्ट असतात का? तिचा गैरवापर होऊ शकत नाही का? असे आरोप लागल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते.’ असे उदित राज यांचे म्हणणे आहे. अनेकांना त्यांच्या म्हणण्यातही तथ्य वाटण्याची शक्यता आहे. पुन्हा स्त्रीाrत्वाचा अपमान करणाऱया इतर घटनांच्या वेळी महिला सन्मानाचे हे दर्शन दुर्दैवाने होत नाही. भाजपच्या मुंबईतील एका आमदाराने महिलांच्या बाबतीत बेताल वर्तन केले. आवडणाऱया मुलींना पळवून आणण्याची भाषा करूनही त्याला पक्षाने व सरकारने सांभाळून घेतले, पण संतापलेल्या महिलांचे उग्र रूप त्याबाबतीत दिसले नाही. महिलांच्या सोयीसाठी न्यायालयाने व्यभिचारास मान्यता देणारे 497 कलमच रद्द केले. हा संस्कार व विवाहसंस्कृतीवर आघात आहे, पण या निर्णयाच्या बाबतीत किती महिलांनी आवाज उठवला? विनयभंग, व्यभिचार, बलात्कार या विकृतीला समाजात स्थान असूच नये आणि त्यास कुठली कवचकुंडलेही लाभू नयेत. पुरुषप्रधान संस्कृतीचे समर्थन कुणीही करणार नाही, पण पुरुषप्रधान संस्कृती नष्ट करताना नव्या विकृत संस्कृतीचा उदय होणार असेल तर तो धोकाही रोखायला हवा. ‘मी टू’चे प्रकरण हे गैरवापराचे हत्यार बनू नये. महिलांचे रक्षण हीच आमची संस्कृती आहे. ती आपण जपलीच पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास केला गेला; पंकजा मुंडेंकडून संपूर्ण व्हिडिओ ट्वीट

Aprna

एअर स्ट्राईकचे पुरावे मागितल्याने दिग्विजय सिंह यांच्यावर मोठी टीका

News Desk

राहुल गांधी जम्मू-काश्मीरला रवाना, विमानतळावर रोखण्याची शक्यता

News Desk