HW News Marathi
राजकारण

निवडणूक आयोगासमोर शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने; आज दुपारपर्यंत पुरावे सादर करणार

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील सत्तांतराच्या दुसरा भाग आजपासून सुरू होणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोघांनी शिवसेनेवर दावा केला आहे. शिवसेना आणि धुष्यबाण कोणाची यावर शिंदे गट आणि ठाकरे गट  केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) पुरावे सादर करण्याचा आज (8 ऑगस्ट) दुपारी 3 वाजेपर्यंत दोघांना गटांनी अर्ज लेखी मांडण्याची  शेवटची वेळ आहे.

शिंदे गटाने बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. यात एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. शिंदे गटाने वेगळी भूमिका घेत पक्षापासून वेगळे झाल्यापासून शिवसेनेवर त्यांनी पक्षावर दावा केला आहे. शिवसेना आणि धुष्यबाणावर दावा करणारी शिंदेची मागणी स्थगित करण्यासाठी शिवसेना आज अर्ज करणार आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट नवा अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटाला खरी शिवसेना कोणाची यासंदर्भात आज दुपारी तीन वाजेपर्यंत लेखी म्हणणे आणि पुरावे सादर करावे, सादर करावे लागणार आहे. तर पक्ष आणि चिन्हाबाबत तुर्तास निर्णय न घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

गेल्या काही वर्षातील पक्षातील निवडणुकीचा इतिहास, शिवसेना पक्षाची स्थपाना आणि पदाची जबाबदारी हे सर्व निवडणूक आयोगाकडे सादर केला जाणार आहे. शिंदेंनी 19 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. यात शिंदेच्या नेतृत्वाच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी. आणि धनुष्यबाण चिन्ह द्यावे, अशी मागणी शिंदेंनी केली आहे.

 

 

 

 

Related posts

मनसेचा गटाध्यक्षांचा मेळावा; राज ठाकरे सभेत काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

#Elections2019 : तांत्रिक बिघाडाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम

News Desk

पंतप्रधान मोदींच्या पक्षाची एक्सपायरी डेट लवकरच संपणार !

News Desk