HW News Marathi
राजकारण

“वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत सोडले मौन

मुंबई | “वेदांता-फॉक्सकॉनच्या (Vedanta-Foxconn) संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार”, असे ट्वीट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावर मौन सोडले. फडणवीसांनी तीन ट्वीट करत विरोधकांवर टीका केली. फडणवीस हे मॉस्को दौऱ्यावर आहेत.  शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार आदी नेत्यांनी वेदांता-फॉक्सकॉन यांनी शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “माझा या नेत्यांना प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला? स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करा, ना की अस्वस्थता आणि नकारात्मकतेवर !”, दुसऱ्या ट्वीटमध्ये फडणवीस पुढे म्हणाले, “मला खेद होतो की केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत.” तिसऱ्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणाले, “वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू.”

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पतप्रधान नरेंद्र मोदी फोनवरून वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी चर्चा झाली असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. या दोघांमध्ये फोनवरून अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्याला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीत सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केल्याची माहिती मिळाली आहे.

 

संबंधित बातम्या

“वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का गेली?”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

“राज्याला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीत सहकार्य करावे”, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन

 

 

Related posts

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला अखेरचा श्वास

News Desk

भाजपकडून युतीसाठी एक पाऊल पुढे

News Desk

आता ‘त्यांना’ स्वतःला भाजपमध्ये जाण्याचा अनुभव घ्यायचा असेल !

News Desk