HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी लग्नावरून आदित्य ठाकरेंची घेतली फिरकी; म्हणाले…

मुंबई | माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या लग्नावरून आज विधानसभेत चर्चा रंगली. आदित्य ठाकरें सरकारने लग्न लावायचे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानसभेत म्हणाल्यानंतर सभागृहात हशा पिकला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज (21 मार्च) पंधरावा दिवस आहे. विधानसभेत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लग्नाच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेला चिमटे काढत फिरकी घेतली. या प्रकरणावरून सभागृहात हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.

 

विधानसभेत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू म्हणाले, “लग्न कामगार आहे म्हणून केले. आता लग्न तटले, याला कोण जबाबदार आहे. सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. यांच्यासाठी काही धोरण आखणार आहे का हा मुळ प्रश्न आहे, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. बच्चू कडूनी उपस्थित केल्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची. तुटले तर त्याला…”, असे म्हणताना फडणवीसांना हसू अनावर झाले. या पुढे फडणवीस म्हणाले, “सांभाळायची जबाबदारी सरकारची आपण जी सूचना केली. जरूर ती तपासून पाहा येईल. आणि त्या संदर्भात काही धोरण तयार करता येईल का?, हे बघू.”

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिल्या तर माननीय बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून प्रश्न विचारला होता का? असा सवाल सभागृहात केला. यावेळी आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. यावर पुढे देवेंद्र फडणवीस म्हटले, “सरकारने लग्न लावायचे, यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. सरकार जबाबदारी घ्याला तयार आहे. यावर आदित्य ठाकरेंनी म्हटले, “ही काय वेगळी राजकीय धमकी आहे का?, असा सवाल हसत केला. “लग्न लावून देऊ, नाही तर तुम्ही आमच्यासोबत बसा”, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आदित्य ठाकरेला लग्नावरून म्हणाले, “आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचे.” यावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंला लग्नावर टोला लगावत म्हणाले, “कोणाचंही तोंड कसं बंद करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न, अनुभवातून बोलतोय.”

 

Related posts

गावात गटतट असावेत असा त्यांचा हेतू असावा, रोहित पवारांचे राम शिंदेंना प्रत्युत्तर

News Desk

आयुक्तावर शाईफेक प्रकरणी पोलिसांनी रवी राणांवर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल

Aprna

अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १७ विधेयके संमत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा! – अजित पवार

Aprna