HW Marathi
राजकारण

‘पूरा बहुमत आएगा…’ मोदींवरचे हे रॅप सॉंग नक्की पहा

मुंबई | सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला ‘गली बॉय’ या सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमातील ‘अपना टाईम आयेगा’ हे गाणे देखील तरुणाईच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. या गाण्याचा आधार घेऊन एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार होऊ शकतो, याचा विचार कोणी केलाही नसेल. मात्र, भाजपने हे करून दाखवले आहे. २ मुलींनी या गाण्याचा आधार घेत पंतप्रधान मोदीवर एक रॅप सॉंग तयार केले आहे.

‘पूरा बहुमत आएगा… २०१४ में भी आया था… २०१९ में भी आएगा’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. पंतप्रधान मोदींवर तयार करण्यात आलेल्या या रॅप सॉंगमध्ये विरोधी पक्षांवर निशाणा साधला गेला आहे. “मोदी जैसा सॉलिड नेता न मिल पाएगा… जब चौकीदार चोरों को भगाएगा।”, असे म्हणत मोदींचे कौतुक करण्यात आले आहे.

पहा पूर्ण गाणे :

Related posts

अमेठीत राहुल गांधी राम तर मोदी रावणाच्या रुपातील पोस्टर वॉर

Ramdas Pandewad

सेना-भाजपचे नेते आमच्या संपर्कात | अशोक चव्हाण

Gauri Tilekar

सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपची लखनऊमध्ये बैठक

News Desk