HW News Marathi
राजकारण

महिला आयोगाने चित्रा वाघ यांना खडसावले; दोन दिवसात उत्तर द्या नाही तर…

मुंबई | उर्फी जावेद (Uorfi Javed ) प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना महिला आयोगाने (Commission for Women) नोटीस पाठविली आहे. महिला आयोगाची बदनामी आणि समाजात महिला आयोगाच्या कार्याबद्दल संभ्रम निर्माण केल्याचा आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केला आहे. उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांच्याकडून प्रसार माध्यमांना खोट्या बातम्या देण्यात आल्या आहेत, असा आरोप रुपाली चाकणकर यांनी आज (6 जानेवारी) पत्रकार परिषदेतून केला आहे.

अश्लील आणि खाणेरडे ओंगळवाणे व्हिडिओ व्हायरल होत असताना, यांची दखल घेण्यास महिला आयोगाला वेळ नसेल. तर मग महिला आयोगावर तिथे बसण्याचा देखील कोणाला अधिकार नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केल्यानंतर रुपाली चाकरणकर म्हणाल्या, “चित्रा वाघ यांनी प्रसार माध्यमातून पूर्णपणे चुकीची माहिती दिलेली आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी, आकसा पोटी, अशा पद्धतीने महिला आयोगावरती चित्रा वाघ यांनी जी भूमिका घेतली आहे. त्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवित आहोत”, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पुढे रुपाली चाकरणकर म्हणाल्या, “महाराष्ट्र राज्या महिला आयोगाची अप्रतिष्ठा होईल, अशी वक्तव्य केलेली आहेत. महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र महिला आयोग आपणास 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार नोटीस पाठवित आहे. अशा रितीने खुलासा सादर करावा, अन्यथा आणि हा खुलासा दोन दिवसात सादर करावा. यामध्ये आपण खुलासा सादर न केल्यास आपले काही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरुण आयोग एकतर्फी कारवाई करेल”, असे नोटीसला मचकूर त्यांनी माध्यमांसमोर वाचून दाखविला.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या पोस्टवर महिला आयोगाने सुमोटोवर दखल घेतली. परंतु, मुंबईच्या रस्त्यावर चालणाऱ्या नंगानाचची दखल का नाही केली?, असा सवाल चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर ताशेरे ओडले होते. या आरोपावर रुपाली चाकरणकर म्हणाल्या, “उर्फी जावेद प्रकरणात तुम्ही सुमोटो का? करत नाहीत. आम्ही सुमोटो करतो, पण सुमोटो कुठे करतो, एखादी घटना मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवरती आघात करत असेल. आणि गोंदियामध्ये गँगरेप झाला, आम्ही त्यात सुमोटो केला. त्यामुळे आम्हाला असे वाटते आम्ही सुमोटो कुठे करावे, समाजात अत्याचार होतो, अन्याय होतो आणि महिलांना सुरक्षिततेची गरज आहे. आम्ही तिथे सुमोटो करतो. मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात होते, त्यावर चित्रा वाघ का बोलत नाही, असा उलट सवाल रुपाली चाकरणकरांनी केला आहे.”

 

चित्रा वाघ नेमके काय म्हणाल्या

उर्फी जावेद प्रकरणी चित्रा वाघ यांनी गुरुवारी (5 जानेवारी) पत्रकार परिषदे घेऊन महिला आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, “समाज माध्यमांमध्ये ऐवढे मोठे अश्लील आणि खाणेरडे ओंगळवाणे व्हिडिओ व्हायरल होत असताना, यांची दखल घेण्यास महिला आयोगाला वेळ नसेल. तर मग महिला आयोगावर तिथे बसण्याचा देखील कोणाला अधिकार नाही, हे सुद्धा मला याठिकाणी सांगायचे आहे. या उर्फीच्यासोबत महिला आयोग सुद्धा बेफाम झाले का?, अशी म्हणायची परिस्थिती आज महाराष्ट्रातील महिलांवर आली असे म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही”, असा आरोप त्यांनी केला होता.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि त्याच्याबरोबर दिग्दर्शक संजय जाधव यांना महिला आयोगाने नोटीस पाठविली आहे. पोस्टरवर दखल घेणारे ट्वीटरवरच बातमी सुमोटोवर दखल घेणार महिला आयोग. मुंबईच्या रस्त्यावर चालणाऱ्या नंगानाच यांची दखल नाही का घेऊ शकत?, असा सवाल करत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला घेरले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्याकडचा इतिहास हा कोणी मराठ्यांनी किंवा ब्राम्हणांनी लिहिलेला नाही! – राज ठाकरे

Aprna

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Aprna

बोरिवलीत राष्ट्रवादीचा भाजप विरोधात गाजर वाटप करून विरोध

News Desk