HW News Marathi
राजकारण

…तर तो दिवस ठरला, प्रश्न ठाकरेंचे उत्तर पवारांचे

पुणे | सामाजिक, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रतील दोन दिग्गज नेत्यांचा सहज वावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित मुलाखतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. या मुलाखतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालायाच्या प्रांगणात २१ फेब्रुवारीला सायंकाळी जाहीर मुलाखत होणार आहे.

शोध मराठी मनाचा या संमेलनात ३ जानेवारीला ही मुलाखत होणार होती. पण, काही अडचणींमुळे ही मुलाखत ६ जानेवारी मुलाखतीची तारीख ठरवण्यात आली होती. या दोन्ही तारखा दरम्यान भिमा-कोरेगाव प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थिती बिघली होती. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

या संमेलनाच्या निमित्ताने शरद पवार आणि राज ठाकरेच्या आगळी-वेगळी मुलाखतीचा योग जुळवून आण्यासाठी आयोजकांनी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी रामदास फुटाणे मुलाखतीसाठी पुढाकार घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार”, सत्यजीत तांबेंचे संकेत

Aprna

निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट न पाहता दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या !

News Desk

“देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हावे,” जे. पी. नड्डा यांचे मोठे विधान

Aprna
राजकारण

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. भाजप सरकार आलं आणि चौथं वर्षही संपलं म्हणजे भाजप-सेना सरकारला या अपत्याला जन्माला घालायला ४ वर्षे लागली”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची आज निवड करण्यात आली आहे. त्यावेळी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली आहे.

“विजय औटी हे उपाध्यक्ष झाले याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते. त्यामुळे अधिक आनंद झाला असता. विजयराव औटी हे मी जेव्हा राजकारणातही नव्हतो तेव्हा समाजवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना मी ओळखतो. ते अरुण मेहता, सुरेश कलमाडी यांच्यासोबत ते काम करत होते”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

“विजयराव औटी यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे कुटुंबच समाजाशी जुळलेले आहे. औटी हे जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली याचा आनंद आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी पक्षातर्फे विजय औटी यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ?

News Desk

दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का ?

News Desk

संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन

News Desk