HW Marathi
राजकारण

…मग पाटीदारांना आरक्षण का नाही ?

मुंबई | महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर गुजरातमधील भाजप सरकारवर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने ताशेरे ओढले आहेत. “महाराष्ट्रातील भाजप सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकते, तर मग गुजरातमधील सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? पाटीदारांना आरक्षण लागू करण्यात राज्यातील गुजरात सरकारचा अहंकार आड येत आहे का?” असा सवाल हार्दिकने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर  हार्दिक पटेल याने गुजरातमध्ये सत्तेत असणारी भाजप असाच निर्णय पाटीदार समाजाबद्दल का घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. गुजरातमध्ये पाटीदारांचे कोणतेही सर्वेक्षण करण्यात आले नाही. असे सर्वेक्षण केले तर राज्यामध्ये पाटीदार हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले असल्याचे सिद्ध होईल.
ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील भाजप सरकारने मराठा समाजाच्या समाजिक आणि आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले तसेच सर्वेक्षण गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे व्हावे अशी मागणी हार्दिकने यावेळी केली. हार्दिक पटेल यांनी उत्तर गुजरातमधील पाटण शहरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

News Desk

अर्थसंकल्प विधीमंडळात सादर होण्यापूर्वीच फुटला !

News Desk