HW News Marathi
राजकारण

…मग पाटीदारांना आरक्षण का नाही ?

मुंबई | महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर गुजरातमधील भाजप सरकारवर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने ताशेरे ओढले आहेत. “महाराष्ट्रातील भाजप सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकते, तर मग गुजरातमधील सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? पाटीदारांना आरक्षण लागू करण्यात राज्यातील गुजरात सरकारचा अहंकार आड येत आहे का?” असा सवाल हार्दिकने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हार्दिक पटेल याने गुजरातमध्ये सत्तेत असणारी भाजप असाच निर्णय पाटीदार समाजाबद्दल का घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. गुजरातमध्ये पाटीदारांचे कोणतेही सर्वेक्षण करण्यात आले नाही. असे सर्वेक्षण केले तर राज्यामध्ये पाटीदार हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले असल्याचे सिद्ध होईल.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील भाजप सरकारने मराठा समाजाच्या समाजिक आणि आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले तसेच सर्वेक्षण गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे व्हावे अशी मागणी हार्दिकने यावेळी केली. हार्दिक पटेल यांनी उत्तर गुजरातमधील पाटण शहरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ; 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna

मोदी म्हणतात, एक दिवस पर्यटक भारतातील शौचालये पाहण्यासाठी येतील

News Desk

“भगवान आणि गाय या दोघांना सोडले तर केंद्र सरकारने सर्वांवर GST लावला,” सुप्रिया सुळेंचा टोला

Aprna