नवी दिल्ली | भाजपचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी “नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि राहतील”, या साध्वी प्रज्ञा यांच्या विधानाचे समर्थन करणारे ट्विट केल्याने राजकारण तापलेले असतानाच हेगडे यांनी याबाबत घुमजाव केला आहे. “महात्मा गांधीजी यांच्या हत्येचे समर्थन करण्याचा प्रश्चच येत नाही. ते ट्विट मी केले नव्हते. गुरुवार (१६ मे) संध्याकाळपासूनच माझे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते”, असा दावा अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.
My account was hacked since yesterday. There is no question of justifying Gandhi ji's murder. There can be no sympathy or justification of Gandhi ji's murder. We all have full respect for Gandhi ji's contribution to the nation.
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) May 17, 2019
“माझे ट्विटर अकाऊंट गुरुवार संध्याकाळपासून हॅक झाले आहे. कोणत्याही प्रकारे गांधीजींची हत्या करणाऱ्याबाबत सहानभुती दर्शविण्याचा किंवा त्यांच्या हत्येचे समर्थन करण्याचा प्रश्चच येत नाही. देशासाठी महात्मा गांधीजी यांनी दिलेले योगदान हे अमूल्य आहे”, असे ट्विट अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. दरम्यान, अनंतकुमार यांच्या ट्विटरवरून साध्वी प्रज्ञा यांच्या गोडसेबाबत केलेल्या विधानाचे समर्थन करणारे ट्विट करण्यात आले होते. मात्र, ते ट्विट आपण केलेचे नसल्याचा दावा हेगडे यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.