HW News Marathi
राजकारण

ठाण्यातील किसननगर भागात शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर आव्हाडांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान हाणामारी झाली. या शिंदे- ठाकरे गटातील (Shinde -Thackeray Group) हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी सोमवारी (15 नोव्हेंबर) रात्री श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ठाण्यातील किसनगर येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे हे नेते उपस्थित राहणार होते. परंतु, त्यावेळी शेकडो शिंदे गटाचे कार्यकर्ते बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले होते. तेव्हा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या बैठकीत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर ठाकरे गटात- शिंदे गटात वादा झाल्यानंतर दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली.

दरम्यान, यापूर्वी शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली आहे. यापूर्वी गणपती विसर्जनावेळी दोन्ही गटात मोठा संघर्ष झाला होता.  यात पुन्हा एका सोमवारी रात्री दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही गटात झालेला राडासाठी ठाण्याच्या बाहेरून लोक मागवली होती, असा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा भ्रमाचा फुगा फुटला…पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून अमोल मिटकरींचा भाजपला टोला!

News Desk

भाजपच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश

News Desk

स्वाभिमानासाठी नाॅट रिचेबल असणारे रविकांत तुपकर भाजपला रिचेबल .. तुपकरांचा स्वाभिमानीला रामराम !

News Desk