HW News Marathi
राजकारण

आज संध्याकाळी रामदास आठवले, महादेव जानकर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | “राज्यमंत्री पद देऊन तोंडाला फक्त पाने पुसण्यात आली”, अशी आरपीआय नेत्यांची भावना असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. रामदास आठवले यांच्या उपस्थित आज (२५ फेब्रुवारी) बैठक सुरु आहे. दरम्यान, या बैठकीनंतर रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत हे चौघेही मुख्यमनातरी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरपीआयच्या बैठकीत स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढविण्याची मागणी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे “आपली खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला जात असून याकडे दुर्लक्ष करा”, असा सल्ला देखील या बैठकीत आरपीयआयच्या नेत्यांनी आरपीआय कार्यकर्त्यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारुच्या प्रतिकात्मक बाटल्यांवर मुख्यमंत्र्यांचा फोटो

News Desk

“…अफवांवर विश्वास ठेवू नये,” शिंदेंनी पवार भेटीचे वृत्त फेटाळले

Aprna

पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजयी रॅली काढू देणार नाही !

News Desk