HW News Marathi
राजकारण

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा हा मोठा निर्णय, आम्ही मुर्मूंचे स्वागत करतो! – मुख्यमंत्री

मुंबई | “आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहमध्ये आणण्याचा हा मोठा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे,” असे म्हणत राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा दिला आहे. हिंगोलीचे आमदार संतोश बांगर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला आहे. या सत्कारासाठी बांगर यांनी हिंगोली ते मुंबई कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले. 

मुख्यमंत्री म्हणाले, “राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे. यात एक आदितवासी महिला द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहे. हे सर्व 50 लोकांचे समर्थन त्यांना आम्ही दिलेले आहे. त्यांच्या पाठिशी आमचे 50 लोक आहे. किंबहुना महाराष्ट्रातील सर्व खासदारांचे देखील हेच म्हणे आहे की,  एक आदिवासी महिला म्हणून या देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदीसाहेबांनी उमेदवार म्हणून त्यांना मुर्मू मॅडम यांना दिलेले आहे. खरे तर आदिवासी समाजाला न्याय देण्याचा एक मोठा निर्णय आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहमध्ये आणण्याचा हा मोठा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे.”

संपूर्ण राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, यासंदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “पूर परिस्थितीमध्ये मी आणि मुख्यमंत्री स्वत: गडचिरोलीला गेलो होतो. तितल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. कुठेही काही कमी पडणार नाही. जिवीत हाणी होणार नाही. यांची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यंत्रणा संपूर्ण अर्लट आहेत. मी सकाळपासून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. ज्या ठिकाणी दुर्गघटना घडली. त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करत आहोत. मला आज रमेश बोरणारेंचा फोन आला. त्यांच्या कन्नड मतदारसंघामध्ये चार लोकांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या सचिव पदी अभिनेत्री नगमा यांची वर्णी

swarit

धक्कादायक… उस्मानाबादमध्ये मतदान करताना राष्ट्रवादीचे फेसबुक लाईव्ह

News Desk

“शिंदे गटाला आमदारांकी वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात सामील होण्याशिवाय पर्याय नाही,” सेनेच्या वकिलांची माहिती

Aprna