HW News Marathi
राजकारण

मोदींच्या केदारनाथ यात्रेमुळे आचारसंहितेचे उल्लंघन टीएमसीची आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय उत्तराखंड दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान मोदींनी काल (१८ मे) केदारनाथचे दर्शन घेऊन गुहेत जावून ध्यानधारणा केली. यानंतर मोदी आज (१९ मे) बद्रीनाथच्या चरणी लिन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराखंड दौरा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला असून तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या पत्रामध्ये तृणमूल काँग्रेसने लिहिले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपलेले आहे. त्यानंतर मोदींनी केदारनाथ यात्रेवर आहेत. परंतु या यात्रेला मिडीयाकडून मोठ्या प्रमाणात कव्हरेज मिळत आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे असे लिहिण्यात आले आहे.

गेल्‍या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजपमध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळत आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील ९ जागांसाठी बंगालमध्ये आज मतदान होत आहे. त्‍यातच या दोन पक्षातील हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने बंगालमधील प्रचाराची मुदत एक दिवसाने कमी केली होती. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्‍यामधील रोड शो मध्येही दोन्ही पक्षांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी झाली होती. यामुळे बंगालमध्ये राजकीय इर्ष्या चांगलीच वाढली आहे. त्‍या पार्श्वभूमीचा आज तृणमुलकडून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्‍याचे दिसून येत आहे.

 

 

 

Related posts

लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहिरनामा समिती जाहीर

News Desk

भारत मोदी मुक्तीसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे | राज ठाकरे

News Desk

साईबाबा पावले! सिंचन योजनेसाठी शिर्डी ट्रस्टची राज्य सरकारला मदत

News Desk