HW News Marathi
राजकारण

आज काँग्रेसने मला माझी जागा दाखवून दिली !

नवी दिल्ली | पंजाबमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आले. बोलण्यापासून रोखल्याने नवज्योतसिंह सिद्धू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “बोलण्यास रोखून आज काँग्रेसने मला माझी जागा दाखवून दिली”, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.

“जर मी राहुल गांधींच्या सभेमध्ये बोलण्यास योग्य नसेन, तर मग मी एक प्रवक्ता किंवा प्रचारक म्हणून देखील योग्य नाही. यापुढे मला बोलण्यासाठी बोलावले जाईल किंवा नाही ते माहित नाही. परंतु, या सभेने मला माझी जागा दाखवून दिली आहे”, अशा शब्दांत सिद्धू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जमाफीच्या योजनेसाठी पंजाबमधील मोगा येथे ही रॅली आयोजित करण्यात आली होती. मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी याचे आयोजन केले होते. दरम्यान, सिद्धू यांना भाषण देण्यापासून रोखण्यात आल्या प्रकरणी आयोजकांना विचारले असता मुख्यमंत्र्यांकडून भाषणासाठी केवळ ४ जणांची नावे देण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैधच, फेटाळले सर्व आक्षेप

News Desk

गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

News Desk