HW Marathi
राजकारण

आज भगवे वस्त्र नेसून बलात्कार केले जातायत, दिग्विजयसिंहांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली | “आज भगवे वस्त्र नेसून बलात्कार केले जात आहेत. आपल्या मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत, हा आपला धर्म आहे ?”, असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी स्वतःवर मोठा वाद ओढवून घेतला आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमात दिग्विजयसिंह बोलत होते. भाजप सरकारवर टीका करत समाजात सुरु असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त करताना दिग्विजयसिंह यांची जीभ घसरली आहे. दरम्यान, दिग्विजयसिंह यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यासह काँग्रेस पक्ष देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दिग्विजयसिंह हे कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. “भगवे वस्त्र नेसून लोक चूर्ण विकत आहेत, बलात्कार करत आहेत. आपल्या मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत ? हा आपला धर्म आहे का ?”, असे वादग्रस्त विधान करत दिग्विजयसिंह यांनी भाजपवर निशाणा साधण्यासाठी समाजात सुरु असलेल्या घटनांवर नाराजी व्यक्त करताना हिंदू धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यापुढे सारवासारव करत दिग्विजयसिंह असेही म्हणाले कि, “आपल्या सनातन धर्माची बदनामी करणाऱ्यांना देव सुद्धा माफ करणार नाही.”

Related posts

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराची हजेरी, चर्चांना उधाण

News Desk

भाजप नेत्याच्या ट्विटरवरून मोंदींवर सडकून टीका

News Desk

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासेना कार्यकर्त्यांची हकालपट्टी

News Desk