HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध

नवी दिल्ली | काँग्रेस पाठोपाठ आता भाजप आज (८ एप्रिल) त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने कोण कोणती कल्याणकारी कामे केली आहे. या संदर्भात माहिती देणार असून शेतकरी, व्यापारी, युवक आणि रोजगार यांच्याशी संबंधित मोठ्या आश्वासनांची घोषणा भाजपकडून केल्याची शक्ता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपच्या अन्य नेते मंडळीच्या उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकताच  ‘हम निभाएंगे’ असा वादा करत ‘जन आवाज’ नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काँग्रेसने गरिबांना आर्थिक न्याय योजनेतून मदत, सरकारी नोकऱ्यांमध्ये २२ लाक रिक्त पदे भरणार आणि या जाहीरनाम्यात देशद्रोह आणि पूर्वेकडील राज्यांमधील असलेल्या सशस्त्र बल विशेष अधिकारी कायदा (आफ्सा) कायदा रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.

फिर एक बार, मोदी सरकार भाजपाची नवी टॅगलाईनची घोषणा

गेल्या लोकसभा निवडणुकीतील ‘अब की बार मोदी सरकार’ ही भाजपाची घोषणा अतिशय गाजली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पुन्हा नवी घोषणा दिली आहे. ‘फिर एक बार, मोदी सरकार,’ असे म्हणत यंदा भाजपाकडून पुन्हा एकदा मोदींच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

Related posts

भारतीय सेनेच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे !

News Desk

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यात दाखल

News Desk