HW Marathi
राजकारण

उद्या सुधीर मुनगंटीवारांचे वनमंत्रीपद जाऊ शकते | राज ठाकरे

मुंबई | “सुधीर मुनगंटीवार बेफिकीरपणे उत्तर देतात”, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच यामुळे मुनगंटीवारांचे वनमंत्रीपद जाऊ शकते, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. अवनी वाघिणीला ठार मारल्यामुळे वनखात्यावर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना आता राज ठाकरेंनी देखील यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी अनिल अंबानी यांच्यावरदेखील निशाणा साधला आहे. “अनिल अंबानींसाठी भाजपने देश विकायला काढला आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. “फक्त पुतळे उभे करून वाघांचे संवर्धन होत नाही”, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे.

Related posts

शदर यादव यांना येते बाळासाहेबांची आठवण

धनंजय दळवी

राम कदम यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाख रुपये | सुबोध सावजी

News Desk

मुंबई उच्च न्यायालयातून धनगर आरक्षणाची कागदपत्रे गायब

News Desk