नवी दिल्ली | माझ्यावर संघ आणि भाजपकडून अनेकदा टीका करण्यात आली आहे. माझ्यासाठी त्यांच्या टीकेपेक्षा दुसरे कोणतेही मोठे गिफ्ट असू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा माझ्यावर टीका करतात, तेव्हा तेव्हा मला त्यांना मिठी मारावीशी वाटते, असा उपरोधिक टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे.
Congress President Rahul Gandhi in Bhubaneswar: The best thing that happened to me as a politician & human being was the abuse I got from BJP & RSS, it has been the biggest gift they could give me. I look at Mr Modi when he abuses me and I feel like giving him a hug. pic.twitter.com/283JmhUrHT
— ANI (@ANI) January 25, 2019
“ते माझ्या आणि मी त्यांच्या मताशी सहमत नाही. मी त्यांच्याशी लढेन. ते पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत म्हणून मी प्रयत्न देखील करेन. परंतु मी कधीही त्यांचा तिरस्कार करणार नाही. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे,’ असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
Congress President Rahul Gandhi in Bhubaneswar: The best thing that happened to me as a politician & human being was the abuse I got from BJP & RSS, it has been the biggest gift they could give me. I look at Mr Modi when he abuses me and I feel like giving him a hug. pic.twitter.com/283JmhUrHT
— ANI (@ANI) January 25, 2019
“एक राजकारणी म्हणून तसेच एक माणूस म्हणून माझ्यासाठी टीका ही महत्त्वाची ठरते. त्यांच्या टीकेपेक्षा माझ्यासाठी दुसरे कोणतेही मोठे गिफ्ट असू शकत नाही. पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा माझ्यावर टीका करतात, तेव्हा तेव्हा मला त्यांना जाऊन मिठी मारावीशी वाटते”, अशा शब्दांत राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर टोला लगावला आहे.
“आपल्याला चीनला शह द्यायचा असेल तर रोजगार संधींमध्ये वेगाने वाढ होणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्त प्रमाणात उत्पादन करतात तेव्हा तुमच्या अडचणी कमी होतात”, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.