HW Marathi
राजकारण

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवत आहेत, भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याची टीका अन् निलंबन

नवी दिल्ली | भाजपच्याच एका वरिष्ठ नेत्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका महागात पडली आहे. “दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवत आहेत”, अशी जहरी टीका लखनऊमधील भाजप नेते आय. पी. सिंह यांनी केली आहे. आय.पी. सिंह यांनी ट्विट करत अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, पक्षाच्या नेतृत्त्वावरच टीका केल्याने आय.पी. सिंह यांचे निलंबन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या सर्व नेत्यांनी आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ असा शब्द जोडलेला असताना आय. पी. सिंह यांनी मात्र आपल्या नावापुढे ‘उसूलदार’ असा शब्द जोडला आहे.

आय. पी. सिंह यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी पक्षातील लोकशाही संपल्याचे म्हटले आहे. आपण खरे बोललो म्हणून आपल्यावर कारवाई करण्यात आली, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. “मी केलेल्या वक्तव्यांमुळे मला ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे मला माध्यमांकडून समजले. मी माझ्या आयुष्यातील तब्बल तीन दशके पक्षाच्या कामासाठी दिली आहेत. मात्र, आज मी खरे बोललो म्हणून माझ्यावर कारवाई करत मला निलंबित करण्यात आले आहे. पक्षातील लोकशाही संपली आहे”, असे सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

आसामचे झाले कश्मीरचे कधी करणार?, उद्धव ठाकरे यांचा भाजप सरकारला सवाल

News Desk

गिरीश महाजनांच्या हातात आंदोलनाचा तोडगा काढण्यासारखे काहीच नाही !

News Desk

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान

News Desk