HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

वायएसआर काँग्रेस-टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत २ नेत्यांचा मृत्यू

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील मिरपूरम येथे वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. यात टीडीपी नेते एस. भास्कर रेड्डी आणि वायएसआर काँग्रेसचे पुल्ला रेड्डी या २ नेत्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एस. भास्कर रेड्डी हे टीडीपीचे डमी एजंट म्हणून काम करतात असा आरोप करत या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर मारहाण झाली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली. एस. भास्कर रेड्डी आणि पुल्ला रेड्डी यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते हाणामारीत गंभीर जखमी झाले होते. या सर्वांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उचारादरम्यान एस. भास्कर रेड्डी आणिपुल्ला रेड्डी यांचा मृत्यू झाला.

Related posts

मुख्यमंत्र्यांची विखे-पाटील यांना अवमानता नोटीस

News Desk

रामदास कदम उद्धव ठाकरेंचा कुत्रा, नितेश राणेंची जहरी टीका

News Desk

राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

News Desk