HW News Marathi
राजकारण

दोन वर्षांनंतर छगन भुजबळ विधानभवनात दाखल

नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दोन वर्षानंतर विधानभवनात प्रवेश केला. अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात त्यांनी सहभाग घेतला. आज कामकाज सुरू होण्यापूर्वी भुजबळ हे विधानभवन परिसरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते मंडळी आमदार उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कौन आया कौन आया, राष्ट्रवादी का शेर आया अशा घोषणा विधानभवन परिसरात दिल्या. भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेत आपले इरादे स्पष्ट केले होते. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. आपण जनतेच्या प्रश्नांवर विधानसभेत तर बोलणारच आहोत पण जनतेत जाऊनही सरकारला जाब विचारणार आहोत, असा इशाराही भुजबळ यांनी दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात येणार ते युतीचेच सरकार !

News Desk

जयाप्रदा रामपूरमधून आझम खानविरोधात निवडणूक लढणार

News Desk

शिवसेनेला कॉँग्रेसकडून युतीची आॅफर

News Desk