HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

उदयनराजे यांच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट, पैशाच्या पाकीटसह मोबाईल फोन लंपास

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे विद्यामन खासदार उदयनराजे भोसले यांनी काल (२ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरला.  उदयनराजे यांनी मोठी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले होते. या रॅलीदरम्यान चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. रॅलीत सहभागी झालेल्या लोकांचे जवळपास ५० तोळे सोने, पैशांची पाकिटे आणि मोबाईल चोरांनी पळविल्याच्या घटना साताऱ्यात घडल्या आहेत. याबाबत २० जणांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढली होती. उदयनराजें यांच्या चाहत्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरांची टोळी रॅलीच्या ठिकाणी दबा धरुन बसली होती. रॅलीमधून लोकांच्या गळ्यातील चेन, खिशातली पाकिटे आणि मोबाईल चोरांनी लंपास केली आहेत.  आपल्याकडील चेन, पैसे मोबाईल चोरीला गेले असल्याचे लक्षात येताच अनेकांनी रॅली अर्धवट सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन 20 हून अधिक लोक आले होते.

 

 

Related posts

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन नाशिकहून नेण्यास केंद्राचा नकार

News Desk

#PulwamaAttack : हे ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांचे अपयश !

News Desk

एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा | अंजली दमानिया

अपर्णा गोतपागर