HW News Marathi
राजकारण

आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना !

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी फारच पुढची तारीख दिली व याप्रश्नी रोजच्या सुनावणी घेण्याच्या तारखा लोकसभा निवडणुकांदरम्यान जाहीर झाल्या तरी आम्हांस आश्चर्य वाटणार नाही. सरकार राममंदिराची वीट रचत नाही आणि सर्वोच्च न्यायालय मंदिरप्रश्नी फक्त तारखांवर तारखा देत सुटले आहे. आता न्यायालयाने आणखी नवी तारीख दिली आहे. अयोध्या प्रकरण काल सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले. अयोध्येत लवकरात लवकर राममंदिर व्हावे असे ज्याला वाटणार नाही तो भंपकच मानावा लागेल. मंदिर व्हावे असे सगळय़ांनाच वाटते, पण ते होत नाही. रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशीच झाली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

तसेच पंतप्रधान मोदी अयोध्येत जाऊन एखादी सभा घेतील व मंदिरप्रश्नी ‘मन की बात’ व्यक्त करतील. हे सर्व राजकारण कायमचे थांबावे म्हणून राममंदिरासाठी अध्यादेश काढाच व रामाला राजकारणातूनही मुक्त करा. आम्ही 25 नोव्हेंबरला अयोध्येत निघालो आहोत ते याचाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी अयोध्येत निघालो आहोत, हे देखील म्हटले आहेत.

सामनाचे आजचे संपादकीय

जसजशा निवडणुका येत आहेत तसतसा रामाचा जप जोरात सुरू झाला आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी फारच पुढची तारीख दिली व याप्रश्नी रोजच्या सुनावणी घेण्याच्या तारखा लोकसभा निवडणुकांदरम्यान जाहीर झाल्या तरी आम्हांस आश्चर्य वाटणार नाही. याचदरम्यान स्वतः पंतप्रधान मोदी अयोध्येत जाऊन एखादी सभा घेतील व मंदिरप्रश्नी ‘मन की बात’ व्यक्त करतील. हे सर्व राजकारण कायमचे थांबावे म्हणून राममंदिरासाठी अध्यादेश काढाच व रामाला राजकारणातूनही मुक्त करा. आम्ही 25 नोव्हेंबरला अयोध्येत निघालो आहोत ते याचाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी.

अयोध्येत लवकरात लवकर राममंदिर व्हावे असे ज्याला वाटणार नाही तो भंपकच मानावा लागेल. मंदिर व्हावे असे सगळय़ांनाच वाटते, पण ते होत नाही. रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशीच झाली आहे. सरकार राममंदिराची वीट रचत नाही आणि सर्वोच्च न्यायालय मंदिरप्रश्नी फक्त तारखांवर तारखा देत सुटले आहे. आता न्यायालयाने आणखी नवी तारीख दिली आहे. अयोध्या प्रकरण काल सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले. ही सुनावणी जेमतेम चार मिनिटे चालली. न्यायालयासमोर इतर अनेक महत्त्वाची कामे पडली आहेत, असे सांगून मुख्य न्यायाधीशांनी सुनावणीसाठी पुढची तारीख दिली. यात धक्का बसावा किंवा आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. 6 डिसेंबर 1992 रोजी हिंदू करसेवकांनी बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त केला तेव्हापासून राममंदिराचा विषय अधांतरी लटकत पडला आहे. राममंदिराचा प्रश्न न्यायालय सोडवू शकणार नाही. रामाला कोर्टाच्या पिंजऱ्यात उभे करून अयोध्येत राममंदिर उभे राहणार नाही. न्यायालयाचे निर्णय हे अनेकदा लोकभावना आणि श्रद्धापरंपरा यांच्याच विरुद्ध असतात. शबरीमाला मंदिर प्रकरणात केरळात झालेला उद्रेक तेच सांगतो. मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, असे कोर्टाने सांगितले. त्यास

महिलांनीच विरोध

केला व आता कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध भाजपचे अध्यक्ष अमित शहाच बोलले आहेत. लोकांकडून स्वीकारले जातील असेच निर्णय कोर्टाने द्यावेत असे मार्गदर्शन शहा यांनी देशाच्या प्रमुख स्तंभास म्हणजे न्यायव्यवस्थेस केले. बाबरीचा ढाचा उद्ध्वस्त कसा झाला याचा शोध घेण्यासाठी सरकारने सीबीआय स्पेशल कोर्ट सुरू केले व ज्यांनी रामाचा वनवास संपविण्यासाठी बाबरी पाडली ते सर्व सज्जन सीबीआय कोर्टात आरोपी म्हणून आजही उभे आहेत. बाबरी पाडणाऱ्यांना आरोपी करून तुम्ही राममंदिर कसे बांधणार? मुळात न्यायालयाचे असे निर्णय मानू नयेत असे भाजप नेत्यांचे म्हणणे असेल तर बाबरी प्रकरणाची चौकशी करणारे कोर्ट अद्याप का ठेवले आहे? त्या सीबीआयचा पाया आणि घुमटही आता कोसळून पडला आहे. श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे व ते अयोध्येतच व्हावे असे मोदी यांना वाटत असेल तर न्यायालय व सगळ्यांच्या सहकार्याची तिकडमबाजी सोडून सरळ एक अध्यादेश काढायला हवा. आता यावर ‘‘अध्यादेश काढणे हे इतके सोपे आहे काय?’’ असे विचारले जात आहे; पण याआधी असे अध्यादेश निघाले नाहीत काय? हा आमचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक चांगले विधान केले आहे. ‘‘जम्मू-कश्मीरमध्ये जेव्हा हिंदू राजा होता तोपर्यंत तेथील हिंदू सुरक्षित होते. शीख बांधवही सुरक्षित होते. मात्र

हिंदू राजवटीचा ऱहास

होऊ लागला आणि कश्मीरात हिंदूंचाही ऱहास झाला.’’ योगीजींचे हे विधान चमत्कारिक आहे. त्यांची भावना व तळमळ आम्ही समजू शकतो, पण कश्मीर हे तेव्हा स्वतंत्र संस्थान किंवा राज्य होते व आज ते हिंदुस्थानचे घटक राज्य आहे. त्यामुळे कश्मीरातील हिंदूंचे रक्षण करण्याची जबाबदारी सध्याच्या हिंदू राजाची म्हणजे पंतप्रधान मोदी यांचीच आहे. देशाला मोदीरूपी हिंदू राजा मिळाला असताना अयोध्येत राम आजही वनवासी का? याचे उत्तर कुणी देईल असे वाटत नाही. निवडणुका आल्या की, राममंदिराची आठवण होते व निवडणुका संपताच राम पुन्हा कडीकुलपात बंद! हे आता तरी थांबावे. पण जसजशा निवडणुका येत आहेत तसतसा रामाचा जप जोरात सुरू झाला आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी फारच पुढची तारीख दिली व याप्रश्नी रोजच्या सुनावणी घेण्याच्या तारखा लोकसभा निवडणुकांदरम्यान जाहीर झाल्या तरी आम्हांस आश्चर्य वाटणार नाही. याचदरम्यान स्वतः पंतप्रधान मोदी अयोध्येत जाऊन एखादी सभा घेतील व मंदिरप्रश्नी ‘मन की बात’ व्यक्त करतील. हे सर्व राजकारण कायमचे थांबावे म्हणून राममंदिरासाठी अध्यादेश काढाच व रामाला राजकारणातूनही मुक्त करा. आम्ही 25 नोव्हेंबरला अयोध्येत निघालो आहोत ते याचाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश नजरकैदेत, टीडीपी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांनो, तुमच्या नसानसांत देशप्रेम आहे कि नाही ?

News Desk

#LokSabhaElections2019 : तृणमूल काँग्रेस देणार ४०.५ टक्के महिला उमेदवार

News Desk