HW News Marathi
राजकारण

प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार !

मुंबई | प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे

सामनाचे आजचे संपादकीय

प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल.

तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास हैदराबादचे नावभाग्यनगर करू, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. निजामाच्या खुणा पुसून टाकून हैदराबादचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे असेही योगींचे म्हणणे आहे. योगी हे भगवे वस्त्रधारी आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. तेलंगणात सत्ता आली तर ओवेसी बंधूंना हाकलून देऊ, असेही त्यांनी जाहीर केले आहे. तेलंगणात निजामाच्या खुणा आहेत व ओवेसी बंधू हे निजामाचे वंशज असल्यासारखेच वागतात. त्यामुळे सरदार पटेलांचा उंच पुतळा उभा करणाऱ्यांनी निजामाची वळवळ थांबवायला हवी. पटेलांनी पोलीस ऍक्शन घेऊन निजामास गुडघे टेकायला लावले, पण हैदराबादेतील मुसलमान समाज आजही निजामाच्याच काळात तरंगत आहे. असे असले तरी ओवेसी बंधू व त्यांच्या ‘एमआयएम’ पक्षाचे राजकारण भाजपसारख्या पक्षांना फलदायी ठरते असेही आक्षेप घेतले जातातच. ओवेसी यांना वापरून राममंदिर प्रश्नी देशात दंगली घडवायचा डाव असल्याची पिचकारी मुंबईतील एका राजकीय नेत्याने मारली. ओवेसी म्हणजे

भाजपची बटीक

असल्याचा आरोप देशातील इतर पक्षही करतात.ओवेसींबरोबर आता प्रकाश आंबेडकर आहेत. त्यामुळे उत्तरेत व इतरत्र काँग्रेसचे नुकसान तसेच भाजपचा कसा फायदा होईल अशी गणिते मांडली जात आहेत. त्यामुळे योगी यांनी हैदराबादचे भाग्यनगर करायचे ठरवले या भूमिकेस महत्त्व आहे. पण निजाम-बाबराच्या खुणा फक्त हैदराबादेतच आहेत काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशभरात आहेत. आमच्या मराठवाडय़ाने निजामाचा अत्याचार सोसला आहे. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव कधी होणार? पुन्हा खुल्ताबाद, अहमदनगर ही नावे आहेतच. योगी धडाधड निजाम आणि बाबराच्या खुणा पुसत चालले आहेत. त्यांनी फैजाबादचे अयोध्या व अलाहाबादचे प्रयागराज केले. त्यावर भाजपमधील मुसलमान नेत्यांची नावेही आता बदलून टाका असा टोला मारण्यात आला. शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी यांचेही नामांतर होणार काय? असा सवाल योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केला. तेव्हा अनेकांना हसू आवरता आले नाही. योगी यांच्या राज्यात सध्या

दंगलीचा भडका

उडाला आहे. गोहत्येच्या संशयावरून दंगा भडकला व त्यात एका होनहार हिंदू पोलीस अधिकाऱ्याची आहुती पडली. सैनिक व पोलिसांना धर्म नसतो. ते आपले कर्तव्य बजावत असतात. त्याप्रमाणे राज्यकर्ता म्हणजे राजानेही आपले कर्तव्य पालन करायचे असते. राजा कालस्य कारणम् म्हणजे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीस राजा जबाबदार असतो. योगी यांनी मोगलाईच्या खुणा पुसून टाकण्यासाठी शहरांची नावे बदलली, पण मूळ प्रश्न ते सोडवायला तयार नाहीत. त्यांच्या समोर इतिहासाची प्रश्नपत्रिका आहे व ते भूगोलाची उत्तरे देत आहेत. प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. मोदीदेखील ही सर्व कामे सोडून पंतप्रधान म्हणून चार राज्यांत प्रचाराला उतरले आहेत. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुकेश अंबानी आणि मोदींमध्ये दुरावा, काँग्रेसशी जवळीक ?

News Desk

“नारायण राणे यांची चार आण्याची पण लायकी नाही”, संजय राऊतांनी बोचरी टीका

Aprna

साताऱ्याच्या श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ

News Desk