HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे घेणार गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन

बीड | राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये सध्या बेबनाव स्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्रीपद आणि जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून सध्या हे दोन्ही पक्ष आडमुठी भूमिका घेत असताना दिसत आहे. त्यामुळेच, विधानसभा निवडणुकीच्या निकालांना १० दिवस उलटून गेलेले असतानाही राज्यात नवे सरकार स्थापन करता आलेले नाही. राज्यात एकीकडे हा सत्तासंघर्ष सुरु असताना दुसरीकडे राज्यातील अनेक भागांतील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे हवालदिल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज (५ नोव्हेंबर) मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीड जिल्ह्यातील गोपीनाथ गडावर जाऊन भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत.

उद्धव ठाकरे आज गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याने गोपीनाथ गडावर समाधीस्थानी शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण आणि भाजपचे चिन्ह असलेले कमळ यांची रांगोळी काढण्यात आली आहे. राज्यात सध्या महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपच्या बिघडलेल्या गणिताच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी काढण्यात आलेली ही रांगोळी काय सुचवू इच्छित आहे ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे या रांगोळीच्या मधोमध ‘आठवण साहेबांची’ हा भावनिक संदेशही येथे लिहिण्यात आला आहे. एकीकडे राज्यात या दोन पक्षांमध्ये मोठा सत्तासंघर्ष सुरु असताना गोपीनाथ गडावर रांगोळी काढून दिलेल्या या सूचक संदेशाकडे सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी फिक्स मॅच पाहात नाही”, देवेंद्र फडणवीसंचा उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर टोला

Chetan Kirdat

शिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा

News Desk

इम्रान खान पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान, आज घेतली पंतप्रधान पदाची शपथ

News Desk