HW News Marathi
राजकारण

RamMandir : उद्धव ठाकरे ‘लक्ष्मण किला’ येथे पोहोचले

अयोध्या | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी ‘लक्ष्मण किला’ येथे दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसह या संपूर्ण बुलेट प्रूफ गाडीतून ‘लक्ष्मण किला’ येथे पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज सकाळी ११ च्या सुमारास आपल्या कुटुंबासह उद्धव ठाकरे अयोध्येसाठी रवाना झाले.

अयोध्येतील साधुसंतांकडून ‘लक्ष्मण किला’ येथे उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे. ‘लक्ष्मण किला’वरील हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे संध्याकाळी ५.३० वाजता शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.

तब्बल २१०० दिव्यांनी उजळणार शरयूचा काठ

‘लक्ष्मण किला’ येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५.३० वाजता शरयूच्या काठावर जाऊन आरती करणार आहेत. यावेळी शरयूचा काठ तब्बल २१०० दिव्यांनी उजळणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

swarit

शिवसेनेशिवाय कोणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही !

News Desk

भाजप प्रवेशानंतर प्रथमच मोहिते-पाटील आणि शरद पवार समोरासमोर येणार !

News Desk