HW News Marathi
राजकारण

केंद्रीयमंत्री अनंत कुमार यांचे निधन

बंगळुरू | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांचे सोमवारी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. अनंतकुमार यांना कॅन्सर आजारी झाला होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांची तब्येत दिवसेंदिवसस खालावत जात होती आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत अखेर मालवली.

“माझ्यासाठी ही खूप दुखत बातमी आहे की, माझे चांगले मित्री अनंत कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. कुमार हे एक उत्कृष्ट नेते असून त्यांनी अगदी लहान वयात राजकारणात प्रवेश केला होता. आम्ही त्यांच्या चांगल्या कामगिरीने ते नेहमीच आमच्या स्मरणात राहणार आहेत, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.”

नुकतेच, गेल्या महिन्यात २० ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले होते. त्यानंतर, बंगळुरू येथील श्री शंकर कॅन्सर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. अनंत कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच, संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटवरवरुन सितारमण यांनी हे वृत्त समजताच अतिशय दु:ख झाल्याचे सांगत अनंत कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

अनंतकुमार दक्षिण बंगळुरू लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रतिनिधीत्व करत होते. १९९६ पासून ते सहावेळा या मतदार संघातून निवडून आले होते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात २०१४ पासून अनंतकुमार यांच्याकडे रसायन व खते मंत्री म्हणून पदभार देण्यात आला होता. तर जुलै २०१६ पासून त्यांच्याकडे संसदीय कार्य मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटीसाठी वेळ दिली नाही ?

News Desk

बीड पोलिसांकडून चंदन तस्करांविरोधात मोठी कारवाई; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Aprna

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

Aprna