HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…तोपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका !

नवी दिल्ली | “जोपर्यंत तुम्ही आमचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आमच्याकडून तुमच्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका”, असे म्हणत ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ या संघटनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंग्रजी दैनिक ‘बिझनेस स्टँडर्ड’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी हल्लीच ट्विट करून देशातील डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आपल्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मात्र, देशातील ‘द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ सारख्या मोठ्या सरकारी बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने याला नकार दिला आहे.

“सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष करून तुम्ही आमच्याकडून तुमच्या “मैं भी चौकीदार” या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका. जोपर्यंत तुम्ही आमचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आमच्याकडून तुमच्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका. सरकारच्या या अशा धोरणामुळे सरकारी बँकांचे कर्मचारी त्रस्त आहेत”, असे एआयबीओसीने पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने “मैं भी चौकीदार” ही मोहिम सुरु केली.“देशाचा चौकीदार खंभीरपणे उभा आहे, देशाची सेवा करतो आहे. परंतु, मी एकटा नाही. भ्रष्टाचाराविरोधात, समाजातील गुन्हेगारीविरोधात जो उभा आहे तो प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. भारताच्या प्रगतीसाठी, विकासासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी या मोहिमेला सुरुवात केली होती.

Related posts

निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये मोठे बदल

News Desk

अहमदनगर-नाशिकवर अन्याय होऊ देणार नाही !

Gauri Tilekar

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे | धनंजय मुंडे

News Desk