HW News Marathi
राजकारण

आगामी निवडणुकीत स्त्री हट्ट फडणवीसांना भोवणार का ?

यशाचे शिखर गाठताना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते अशी म्हण आहे. या म्हणीला साजेशी अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावले तर पहायला मिळतात. राजमाता जिजाऊ भोसले ज्या खंबीरपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे उभ्या राहिल्या म्हणून स्वराज्य निर्मिती झाली. सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या पाठीमागे खंबीर उभ्या राहील्या म्हणून महाराष्ट्रातील मुली- महिला शिक्षण घेऊ शकल्या. ज्या प्रमाणे स्त्री पाठीशी खंबीरपणे उभी असेल तर स्वराज्य निर्मीती होऊ शकते तसेच एखादी स्त्री चांगल्या व्यक्तीसाठी टिकेचा विषय देखील बनू शकते. याचे सर्वात महत्वाचे आणि सध्या चर्चेत असलेले उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस.

महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी काही मोजक्या कार्यक्रमात लोकांना दिसत असते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक कार्यक्रमात उपस्थिती दर्शवतात. अनेकदा त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमांमुळे तर सध्या सेल्फीमुळे त्या चर्चेत आहेत. मुळात मुख्यमंत्र्यांची पत्नी असल्यामुळे अमृता यांच्या सोबत मुख्यमंत्री फडणवीस देखील सोशलमिडीयावर टिकेचा विषय ठरत आहेत.

अमृता फडणवीस यांचा क्रुझवर काढलेला वादग्रस्त सेल्फी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सेल्फीसाठी नसते धाडस केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या कृत्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळत आहे. शनिवार २० ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई-गोवा क्रूझ सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्रूझच्या टोकाला बसून सेल्फी काढण्याचा मोह अमृता यांना आवरता आला नाही.

अमृता यांच्या या कृत्यामुळे अधिकाऱ्यांची गाळण उडाली होती. एका पोलिस अघिकाऱ्याने तर चक्क डोक्याला हात मारुन घेतला. हा सारा प्रकार व्हीडिओत कैद झाला आहे. सध्या सोशल मिडीयावर या सेल्फीची प्रचंड चर्चा होत असल्याचे पहायला मिळत आहे. यावर माध्यमांना स्पष्टीकरण देताना सौ. फडणवीस म्हणाल्या, मी ज्या जागी बसले होते ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढायला गेले नव्हते. मी बऱ्याच दिवसांनी शुद्ध हवेचा अनुभव घेत होते त्यामुळे सध्या सेल्फीनंतर त्यांच्या स्पष्टीकरणामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. मुळात अमृता पडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून न वागता त्यांनी अशा प्रकारची कृत्य केल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची माध्यमांसमोर गोची होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील नद्यांचे संवर्धन करा, सौ. फडणवीसांच्या गाण्यामुळे निर्माण झाला होता वाद

मुंबईतील नद्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवरून विरोधकांनी टीका सुरू केली आहे. २४ फेब्रुवारी २०१८ ला टी-सिरीज कडून हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता.

या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी गाताना आणि ताल धरताना दिसत असल्याने विरोधकांनी या व्हिडीओवर प्रचंड टीका केली होती. ‘असे व्हिडिओ काढून जर राज्याचे प्रश्न सुटणार असतील तर विरोधी पक्षांनाही बोलवा. त्यांना का बाजूला ठेवता? सरकार नाचतेय, प्रशासन नाचत आहे मग विरोधकांनाही नाचायला बोलवा,’ अशी टिका फडणवीस सरकारवर विरोधकांकडून करण्यात आली होती.

संगीत रजनी कार्यक्रम औरंगाबाद, कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीचा वाद

औरंगाबादमध्ये १६ ऑगस्ट २०१७ ला अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस रजनी या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी आपले गायन सादर केले होते. परंतु या कार्यक्रमाचे तिकीट विकण्याचे काम पोलिसकर्मचा-यांवर सोपविण्यात आल्यामुळे हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. ५१,००० रुपये तिकीट असल्यामुळे ते विकण्याची जबाबदारी पोलीस अधिका-यांवर सोपविण्यात आली होती.

माजी मंत्री कमल किशोर कदम, महात्मा गांधी मिशन आणि औरंगाबाद शहर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माध्यमांच्या अहवालानुसार, पैसे गोळा करण्यासाठी ५१,००० रुपये किंमतीची तिकिटे औरंगाबाद शहरातील १५ पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिका-यांना देण्यात आली होती. त्यामुळे हा कार्यक्रम पोलिसांसाठी आहे की मिसेस फडणवीस यांच्यासाठी आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. कार्यक्रम विनामूल्य असूनही हजारो रुपयांच्या विशेष प्रवेशिका निवडक २०० व्यक्तींसाठीच तयार करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टिकेचे धनी ठरले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या समस्या वाढविण्यासाठी निवडणूक लढवणारे प्रवीण तोगडीया

News Desk

मंत्री महादेव जानकर यांना दिलासा

News Desk

उमेदवार यादीत स्मृती इराणींच्या नावापुढे धर्माचा उल्लेख, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा

News Desk