नवी दिल्ली | उपेंद्र कुशवाहा यांनी आज आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. बिहारमधील एनडीए आघाडीत आपल्या पक्षाला आवश्यक तेवढे स्थान मिळत नसल्याने उपेंद्र कुशवाहा नाराज गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. दरम्यान, यावेळी कुशवाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले. मात्र, त्या दृष्टीने कोणतेही काम सुरु झालेले नाही. बिहार पूर्वी जसे होते तसेच आजही आहे”, अशी टीका कुशवाहा यांनी केली.
RLSP Chief Upendra Kushwaha: Koshish inki (BJP) nirantar rahi hamari party ko barbad karne ka,Nitish ji ki alag koshish rahi aur dono mil gaye.Nitish ji ke saath khade huye BJP ke log,aur mera apmaan shuru ho gaya.Nitish ji ne saarvjanik roop se mujhe neech keh ke sambodhit kiya. pic.twitter.com/PjdvP18RnA
— ANI (@ANI) December 10, 2018
”एनडीएमधील माझा अनुभव अत्यंत वाईट आहे. बिहारच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सभांमध्ये वारंवार माझे मत मांडले. मात्र, मला असे अनेकदा भाजपकडून सांगण्यात आले कि बिहारच्या लोकांना न्याय देण्याचे काम नितीश कुमार करीत आहेत. माझ्या पक्षाला संपविण्याचा प्रयत्न कायमच भाजप आणि नितीश कुमार यांच्याकडून केला गेला”, असे कुशवाह यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या आरएलएसपी पक्षाला अधिक जागा मिळाव्यात ,अशी मागणी कुशवाहा यांनी केली होती. मात्र भाजपने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. बिहारमधील एनडीएच्या आघाडीत संयुक्त जनता दलाने पुन्हा केलेल्या प्रवेशाने लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण झाला होता. यात आपल्या योग्य स्थान न मिळाल्याने कुशवाहाअनेक महिन्यांपासून नाराज होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.