HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

गडचिरोलीत मतदान करून परतणाऱ्या मतदारांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

गडचिरोली | देशभरात आज (११ एप्रिल) लोकसभा निवडणुकांसाठीचा मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असणाऱ्या गडचिरोलीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अपघात झाला आहे. गडचिरोलीमधील देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परतत असताना एका ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ९ जणांना नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

देशभरात आज (११ एप्रिल) लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडत आहे. देशातील एकूण २० राज्यातील ९१ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. गडचिरोलीमधील हे १० ते १२ जण मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरमधून शंकरपूर मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान करून पुन्हा परतत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या या अपघात त्यांच्यापैकी ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

देशात पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघांसह उत्तर प्रदेशमधील ८, बिहारमधील ४, आसाम आणि महाराष्ट्रामधील ७, ओडिशातील ४ आणि पश्चिम बंगालच्या २ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Related posts

दीदी तुम्ही जर काही केलेच नाही, तर मग घाबरता कशाला?

News Desk

शिवेंद्रसिंहराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

News Desk

…म्हणून मी पंतप्रधान मोदींविरुद्ध वाराणसीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला !

News Desk