HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अशा ठिकाणी वार केला कि पाकिस्तानची बोलती बंद झाली !

नवी दिल्ली | “पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या एअर स्ट्राईकचे संपूर्ण श्रेय भारतीय जवानांना जाते. जवानांच्या शौर्याला माझा सलाम आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे आहेत. मात्र, जगापासून हे लपविण्यासाठी पाकिस्तान कायमच खोटे बोलते. म्हणूनच आम्ही अशा ठिकाणी वार केला कि पाकिस्तानची बोलती बंद झाली. मात्र, आपल्याच देशातील काही लोक मोदींनाच शिव्या देण्यात मोठेपणा मानतात”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘मै भी चौकीदार’ या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली आहे.

मी जर कोणताही निर्णय घेताना माझ्या राजकीय फायद्याचा विचार केला असता तर मी देशाचा पंतप्रधान होऊन काहीही बदलले नसते. माझ्यासाठी देश अधिक महत्त्वाचा आहे. देशाची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. म्हणूनच, ज्या ठिकाणाहून या दहशतवादी कारवाया नियंत्रित केल्या जातात तिथेच हल्ला करायचा असा निर्णय मी घेतला”, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. “जगात आज दिसणारी भारताची ताकद ही एकट्या मोदींमुळे नव्हे तर सव्वाशे कोटी जनतेने पूर्ण बहुमताने निवडून दिलेल्या सरकारमुळे दिसते आहे. यामुळे जगात भारताला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे”, असेही मोदी यावेळी म्हणाले.

“भारतीय जवानांवर सामर्थ्यावर मला पूर्ण विश्वास आहे म्हणूनच मी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. दहशतवाद्यांचे मूळ कुठे आहे हे सर्वांनाच माहित आहे. दहशतवादी मुंबईत आले अनेक निरपराधांना मारले, उरीमध्ये आले जवानांवर हल्ला केला. हे असे कधीपर्यंत चालणार ? म्हणून मी निर्णय घेतला कि जेथे दहशतवाद्यांचे रिमोट कंट्रोल कुठून चालते तिथेच हल्ला करायचा. माझ्यासाठी निवडणूक नव्हे तर देश महत्त्वाचा होता. मी देशाच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले”, असे मोदी म्हणाले.

“देशातून पळून गेलेले काही लोक परदेशातील न्यायालयात सांगतात कि, भारतातील तुरुंगाची अवस्था वाईट आहे. आम्ही तिथे राहू शकत नाही. मग आता आम्ही यांना राहायला महल द्यायचे का ? इंग्रजांनी गांधींना ज्या तुरुंगात ठेवले होते त्यापेक्षा चांगला तुरुंग थोडीच देणार ?”, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी लगावला आहे.

Related posts

देशात मोदी-शाह जोडीचा प्रयोग फसला म्हणून मोदींनी पत्रकार परिषद घेतली !

News Desk

…तोपर्यंत आमच्याकडून ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका !

News Desk

अमेठीपेक्षा इटलीतील लहान मुलांना शिव्‍या शिकवा !

News Desk