HW News Marathi
राजकारण

आम्ही आधी मुलांना घेतले अन् वडील आपोआप आले !

मुंबई | “आधी मुलांना घेतले , वडील आपोआप आले, आम्ही फार हुशार आहोत”, असे स्पष्ट विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मधुकर पिचड यांच्या प्रवेशावर केले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि आमदार वैभव पिचड यांनी आज (३१ जुलै) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, “आम्ही आधी सुजय विखे यांना घेतले, नंतर राधाकृष्ण विखे आमच्याकडे आले. रणजितसिंह मोहिते- पाटीलांना घेतले मग विजयसिंह मोहिते-पाटील तर संदीप नाईकांना घेतल्यानंतर गणेश नाईक आमच्याकडे आले, आधी मुलांना घेतले, वडील आपोआप आले, आम्ही फार हुशार आहोत.”

“भाजप आणि सेनेची युती अभेद्य आहे. आम्ही स्वबळावर लढणार नाही. महाराष्ट्रात युतीचे सरकार निवडून आणू, भाजप पक्ष ही काही धर्मशाळा नाही, आम्ही फक्त महत्त्वाच्या नेत्यांना आमच्या पक्षात प्रवेश दिला आहे,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या गरवारे क्लब येथे भाजपामध्ये जाहीररीत्या प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते हजर आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, नावे जाहीर करा,” एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला ओपन चॅलेंज

Aprna

राफेलवरून संसदेत गदारोळ, राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार

News Desk

धमकी आली हा म्हाडाच्या अध्यक्षांचा डाव !

News Desk