मुंबई | “आम्ही पाय चाटले, गद्दार त्यांचे काय चाटत आहेत माहिती नाही”, अशी बोचरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिलेल्या निर्णयावरून उद्धव ठकारेंनी आज (19 फेब्रुवारी) उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काल मोगँबो म्हणाले आम्ही पाय चाटले, गद्दार त्यांचे काय चाटताहेत माहिती नाही. बोहरा समाजाने बोलावले मी गेलो दिखावा नाही केला. पोळ्या नाही लाटल्या. मला प्रेमाने बोलावले मी गेलो जुने संबंध. मुफ्ती मोहम्मद सोबत गेले तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्व.ज्यांना जायचे ते जाऊ शकतात पण त्यांनी इतर पक्षात जायला हवे होते. शिवसैनिकांनी घाम गाळून त्यांना मोठ केले तेच आज मालक बनायला बघताहेत. माझे वडील हवेत पण मुलगा नको. मी काय वाईट केल तुमच्यासोबत. मी भाजपला मुख्यमंत्री पद मागितले. मला मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते पण पवार साहेब म्हणाले. भाजपने अडीच वर्ष त्यांनी वचन पूर्ण केले असते तर आज हे सगळ करायची गरज नव्हती. पण बर झाल जे झाल आज जनतेत रोष.”
माझ्याकडून चोरलेले धनुष्यबाण घेऊन माझ्यासमोर या
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला एक गोष्टी माहिती नव्हते की, केंद्रीय निवडणूक आयोगमध्येच आपला निकाल देईन. ठिक आहे काल त्यांनी माझा धनुष्यबाण हिसकवून घेतला. आता स्वत: प्रभू रामचंद्र माझ्यासोबत आलेले आहेत. तर असे होत राहते. योगा योगाची गोष्ट आहे की, काय यामागे नेमके काय कारण आहे. कधी कधी अशा गोष्टी होत असतात. मी तर काल रस्त्यावर उतरून आव्हान केले आहे. ज्या लोकांनी माझ्या पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हिसकावून घेतला आहे. मी त्यांना आव्हान केले आहे की, जर तुम्ही पुरुष आहात. तुमच्या हिंम्मत असेल माझ्याकडून चोरलेले धनुष्यबाण घेऊन माझ्यासमोर या. मी माझी मशाल घेऊन तुमच्या समोर येईन. मग बघू काय होतय ते. गेल्या 25-30 वर्षापेक्षा जास्त तुम्ही आणि आम्ही एकमेकांचे विरोधक होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मी उत्तर भारतीय आणि मराठी नाही म्हणत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कोणती गोष्ट झाली की, आम्ही तर हिंदुत्वादी आहोत. आज पण मी म्हणतो की मी हिंदुत्वादी आहे. मी कधीही हिंदुत्व सोडले नाही. आणि मी कधीही हिंदुत्व सोडणार पण नाही. मी तर भाजपला सोडले, हिंदुत्वला नाही सोडले. भाजप म्हणजे हिंदुत्व नाहीय. आणि त्यांचे जे हिंदुत्व आहे. ते आमचे हिंदुत्व नाहीय. ते हिंदुत्व आम्हाला मंजूर नाही. जे माझ्या वडिलांनी मला शिकवण दिली. ते हे हिंदुत्व नाहीये. माझ्या वडिलांच्या भाषेत सांगू तर राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व हे देशाशी जोडलेले आहे. यांचे जे हिंदुत्व आहे. ते आप आपसात भांडण लावणे. कुटुंबात भांडणे लावा. पक्षात भांडणे लावा. आणि सत्ता काबीज करणे.”
पक्षाचे नाव आणि चिन्ह आमच्यासोबत जे गुलामांना दिले
“काल पुण्यात कोणी तरी आले होते, त्यांनी विचारले, काय महाराष्ट्रात कसे चालले आहे. तर म्हणले आज खूप चांगला दिवस आहे. तर का शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आम्ही आमच्यासोबत जे गुलाम आलेत त्यांना दिले. त्या व्यक्तीने म्हटले, खूप चांगेल मोगँबो खुश हुआ, उद्धव ठाकरेंनी असे म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “हा मोगँबो आहे. जर तुम्ही मिस्टर इंडिया तुम्ही आठविला तर त्यात असेच आहे की मोगँबोला हेच हवे असते. देशात ऐकमेंकांविरोधात लढाई होईल. लोक आपआपसात लढत राहतील. आणि ते लढाईत व्यस्त राहिले तर मी राज करणार. आज के मोगँबो येई तो है. मग ते हिंदू आहेत, जे आमच्यासोबत आहेत तेच आमचे. त्यांना हिंदु असो की इतर कोणी त्यांना काही फरक पडत नाही. जर तुम्ही आमच्या पक्षात येतात. तुम्ही हिंदु नाही तर तुम्ही हिंदुत्व सोडले. तुम्ही मला सांगा, मी तर वाटच बघतोय की, तुम्ही बीकेसीमध्ये कधी सभा घेत आहात. मला तर लोकांसमोर येईचे आहे. लोकांमध्ये येईचे आहे. आणि मला विचारायचे आहे की, सांगा मी काय चुकी केली आहे. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. मी कुठे भेदभाव केला आहे. मी कधी आपआपास लढाई घडवून आणली आहे. शिवसेनेने कधी आपआपसात लढाई घडवून आणली आहे. कधीच नाही, वाईट फक्तच ऐवढे वाटते की, 1992-93 तुम्ही उल्लेख केला. हेच तर माझे शिवसैनिक आहेत. आमच्या शिवसैनिकांनी मुंबईला वाचविले होते. आज जे हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहेत. ते तेव्हा कुठे होते. कुठे गेले काही माहिती नाही. आणि आता छाती दाखवित आले आहेत. तुमचा 56 इंचा छाती तेव्हा कुठे होती. तेव्हा तर त्यांना घाम फुटला होता. आता सांगतात की 56 इंचाची छाती. तेव्हा तर घामच घाम फुटला होता. तेव्हा ज्यांनी मुंबई वाचविली. तुम्ही त्यांना गुन्हेगार माणत आहात. मी काँग्रेससोबत गेलो, मी नाही गेलो मला भाजपने ढकलले आहे. भाजपने मला ढकलले.”
बाळासाहेबांच्या शिवसेनेला धोका
“ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेसोबत वागणूक केली आहे. आणि करत आहेत. आम्ही काय बिघडविले आहे. तुम्हाला माझ्या वडिलांचा चेहरा पाहिजे. परंतु, त्या वडिलांचा मुलगा नकोय. जो तुमच्या सोबत होता. तो तुमच्यासोबत चालायला सुद्धा तयार होता. तुम्ही ज्यांना नेता मानता. त्यांना मी वचन दिले होते की, मी शिवसैनिकांना मुख्यमंत्री बनविणार. तो वचन पाळणारा. जर धोका देतो. मला त्यांच्यासोबत कसे वागले पाहिजे. ज्यांनी मला फसविले. बाळासाहेबांच्या शिवसेनेला धोका दिला. तुम्हाला त्यांचे तळवे चाटणार चालतात. मग माझे काय चुकले होते. मी हेच तर मागत होतो. मी जे गोष्ट तुमच्यासमोर ठेवली होती. चला मी तर अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. मी तर मुख्यमंत्री बनण्यास तयार नव्हतो. माझे ते स्वप्न नव्हते”, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावरून भाजपवर निशाणा साधळा.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.