HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू !

जयपूर | “मी पक्ष कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. मला पक्षाच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू. पक्षाचा आदर करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत”, असे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी म्हटले आहे. तीन राज्ज्यांमध्ये मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस पुढे या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री ठरविण्याचा पेच उभा राहिला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन्ही नेत्यांचे समर्थक आता आक्रमक प्रचंड आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आज (१३ डिसेंबर) संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, “राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी सचिन पायलट यांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळालेच पाहिजे. राजस्थानात निम्म्याहूनही अधिक आमदारांचे सचिन पायलट यांना समर्थन आहे. त्यामुळे तेच राजस्थानचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. जर सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री केले नाही तर आपण काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार”, असे पी.आर.राणा यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेच्या निकालानंतर शिवसेनेच्या २३ विजयी खासदारांना काशीविश्वेश्वराला घेऊन जाणार !

News Desk

आंध्र प्रदेशाच्या उमदेवाराने रागात ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळली

News Desk

EVMHacking : ‘त्या’ पत्रकार परिषदे मागे काँग्रेसचा हात !

News Desk