HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आम्ही भाजपच्या नव्हे तर रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार, जानकरांची भूमिका

मुंबई | राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना डावलून भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेल्या महादेव जानकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुमचा निर्णय तुम्हाला लखलाभ असो. आम्ही तुमच्यासोबत असलो तरीही आम्ही रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट केले आहे.

रासपचे आमदार राहुल कुल हे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. याचमुळे राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपने यावेळी राजकीय डाव खेळ एकीकडे रासपच्याच आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिली तर दुसरीकडे रासप अध्यक्ष जानकर यांना उमेदवारी नाकारली आहे. याचमुळे जानकर नाराज असल्याची चर्चा आहे.

काय म्हणाले महादेव जानकर ?

  • भाजप माढा आणि बारामती रासपला देत होते. मात्र, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास सांगत होते. म्हणून आम्ही त्या जागा स्विकारल्या नाहीत.
  • मला आघाडीमध्ये ६ जागा देत होते. परंतु, मी बुडत्या नावेत बसणारा नाही.

Related posts

लक्ष्मीकांत खाबिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी

Gauri Tilekar

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

News Desk

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk