HW News Marathi
राजकारण

बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नाही !

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज (११ जानेवारी) चौथ्या दिवशी देखील तोडगा निघालेला नाही. बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना सध्या तरी न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (१४ जानेवारी) सुनावणी होणार आहे. बेस्टचा संपात न्यायालयाच विरोधाभासी पवित्रा घेतला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर उद्या (१२ जानेवारी) राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची बैठक होणार आहे. संप मिटल्याची घोषणा करण्याचा आग्रह सरकार आणि पालिकेकडून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना केला जात आहे. मात्र, संपावर तोडगा काढल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, असे संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज चौथ्या दिवशी देखील तोडगा निघालेला नाही.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गिरीराज सिंह यांना वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून नोटीस

News Desk

इम्रान खान पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान, आज घेतली पंतप्रधान पदाची शपथ

News Desk

आपल्याच रयतेला फसवून..स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही !

News Desk