HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

हम निभाएंगे ! जाहीरनाम्यातील दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करणार, काँग्रेसचा दावा

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज (२ एप्रिल) प्रसिद्ध झाला आहे. काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव ‘हम निभाएंगे’ असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलेले आश्वासन पूर्ण केलेल नाही. परंतु आम्ही जाहीरनाम्यात जे आश्वासन दिली ती पूर्ण करणार असल्याचे सांगत राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.

मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तो फक्त एक विनोद होता. त्यामुळेच आम्ही जाहीरनामा करताना फक्त जे शक्य होऊ शकते, अशाच गोष्टींवर भर दिला, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. काँग्रेसच्या जाहीरनामा न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे.

यापूर्वी राहुल गांधींनी न्याय योजनेची घोषणा करत गरीब कुटुंबांना ७२ हजार रुपयांची वार्षिक मदत करत. तसेच करामध्ये सवलत आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये २२ लाक रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे. आपण दरवर्षी लोकांच्या खात्यात किती रुपये जमा करू शकतो, असा प्रश्न जाहीरनामा समितीला विचारला.

देशातील बेरोजगारीचा मुद्दादेखील महत्त्वाचा असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. ‘मोदींनी २ कोटी रोजगारांचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचे काहीच झाले नाही. आम्ही २२ लाख सरकारी नोकऱ्या देऊ. सध्या इतक्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. सत्तेत आल्यावर मार्च २०२० पर्यंत या जागा भरल्या जातील. १० लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार दिला जाईल,’ असे राहुल म्हणाले.

 

Related posts

बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, शरद पवारांवर माधव भंडारींची टीका

News Desk

मोदींच्या जाहीरसभेत भाजपच्या एका मंत्र्यांकडून महिला मंत्र्यांचा विनयभंग

News Desk

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार आंदोलन ?

News Desk