मुंबई | राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (14 ऑगस्ट) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविली होती. यानंतर राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप (Cabinet Devolution) जाहीर करण्यात आले आहे. शिंदे सरकारच्या खातेवाटपानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. “आमच्यात कोणत्याही खातेवाटवरून वाद नाही. खाते कोणते हे महत्वाचे नाही. ते चालवणारी योग्य व्यक्ती असली पाहिजे.”
खाते वाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी खातेवापट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंत्री माझ्यासही सर्व मंत्री त्यांना मिळालेल्या खात्याला न्याया देण्याचे काम करू. आता आमचे मंत्रिमंडळ अजूनही कमीच आहे. त्यामुळे आमच्यावर जास्त भार आहे. परंतु, त्यालाही न्याया देण्याचे काम आम्ही करू. आणि लवकरच पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यावेळी आमच्याकडील काही खाती अजूनकाही आमच्या सहकार्याकडे जातील. पण, तोपर्यंत ज्यांच्याकडे जी खाती आलेली आहेत. त्या खात्यांना पूर्ण न्याय देण्याचे काम आम्ही करू.
जी जास्तची खाती मुख्यमंत्री आणि तुमच्याकडे आहेत. ती खाती त्या पक्षाकडेच राहिली, पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “जवळपास तसेच असते, पण अगदी शिंदे गटाला वाटले की, त्यांच्याकडे एखादे खाते आम्ही देऊ किंवा आम्हाला वाटले की त्यांच्याकडेचे एखादे खाते आम्हाला हवे, तर आम्ही घेऊ. तर ते आम्ही त्यांच्याकडून घेऊ. आमच्यात कोणत्याही खात्यासंदर्भात वाद नाही. खाते कोणते हे महत्वाचे नाही. ते चालवणारी योग्य व्यक्ती असली पाहिजे. तर त्या दृष्टीने मला असे वाटते, आता तरी त्यांच्याकडची खाती आहेत. ती विस्तारामध्ये त्यांच्या लोकांना ती मिळतील. तसेच विस्तार काही खाती आमच्या लोकांना मिळतील. यात काही बददल करायची गरज वाटली तर आम्ही बसून बदल करू.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.