नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली आहे. ही परवानगी नाकारल्याने राहुल गांधी यांची सिलिगुडी येथील जाहीर सभा रद्द करावी लागली आहे. पश्चिम बंगाल सरकारने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला देखील यापूर्वी परवानगी नाकारली होती. देशातील लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये देशभरात आगामी लोकसभा निवडणूका पार पडतील. ११ एप्रिलला यातील पहिला टप्पा पार पडला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
“आम्ही आमच्या नियमांनुसार त्या ग्राऊंडवर राहुल गांधी यांना हेलिकॉप्टर उतरविण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र, याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता”, असे सिलिगुडीचे पोलीस आयुक्त बी.एल. मीणा यांनी स्पष्ट केले आहे. १४ एप्रिलला पोलीस ग्राऊंडवर राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी नाकारल्याने राहुल यांची सिलीगुडी येथील जाहीर सभा रद्द करावी लागल्याचे काँग्रेस नेते आणि दार्जिलिंगचे उमेदवार शंकर मलाकार यांनी सांगितले आहे.
ममता बॅनर्जी यांनी ३ एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीला देखील परवानगी नाकारली होती. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील कावाखाली मैदानावर ३ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने ही परवानगी नाकारली असल्याचे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.