HW News Marathi
राजकारण

अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या किंकाळ्याच

मुंबई | रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्या लोकांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. या संपूर्ण प्रकरणात भारतीय रेल्वे प्रशासन किती कुचकामी आहे. अमृतसर येथील दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होईल. त्याने काय होणार? रामलीलेतील रावणदहनाचा सोहळाच अपघातास कारणीभूत ठरला. रावणाची भूमिका करणारा कलाकारही अपघातात मेला, पण त्याने अनेकांचे प्राण वाचवले. रावणाने पत्करलेल्या हौतात्म्याची तरी कदर ठेवा.

विकास आणि प्रगतीच्या गोष्टी आम्ही करतो, पण रेल्वे यंत्रणा साफ भंगारात गेली आहे. सिग्नल यंत्रणा, तडे गेलेले रूळ, वेळापत्रक सुविधा यांची बोंब असताना राज्यकर्ते ‘बुलेट ट्रेन’च्या नावाने दांडिया खेळतात याचे आश्चर्य वाटते. हा जनतेच्या जिवाशी खेळ आहे. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेत बावीसवर लोकांचे प्राण गेले. अंधेरीत रेल्वेचा फूटब्रिज कोसळून लोकांचे प्राण गेले. लोकल ट्रेनमधून लटकणारे प्रवासी, रूळ ओलांडणारे लोक मोठ्या प्रमाणात मरत आहेत. देशात शेकडो ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघात होतात. मग रेल्वेचे खाते म्हणून

सामनाचे आज संपादकीय

अमृतसर येथील दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होईल. त्याने काय होणार? रामलीलेतील रावणदहनाचा सोहळाच अपघातास कारणीभूत ठरला. रावणाची भूमिका करणारा कलाकारही अपघातात मेला, पण त्याने अनेकांचे प्राण वाचवले. रावणाने पत्करलेल्या हौतात्म्याची तरी कदर ठेवा. नाहीतर अमृतसर, पाटणा, मुंबईप्रमाणे अपघात होतच राहतील. अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या करुण किंकाळ्याच होत्या. त्यांचे अश्रू कसे पुसणार?

आमच्या देशात महागाईचा भडका उडाला आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया महाग झाला, पेट्रोल-डिझेल महाग झाले, पण सामान्य जनतेचे मरण मात्र स्वस्त झाले आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा भयंकर प्रकार पंजाबात घडला आहे. जालियनवाला बाग इंग्रज राजवटीत घडले, अमृतसरचे हत्याकांड स्वराज्यात घडले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळवूनही किड्यामुंग्यांसारखे मरण जनतेच्या नशिबी कायम आहे. विजयादशमीच्या दिवशी रावणदहनाच्या वेळी रेल्वेखाली चिरडून 70 लोकांचे प्राण गेले आहेत. शंभरावर गंभीर स्वरूपात जखमी झाले. हा कार्यक्रम रेल्वेरुळांवरच आयोजित केला होता व रावणदहनात दंग असलेल्या हजारो लोकांना चिरडत रेल्वे पुढे गेली. माणसे शेतावर मरत आहेत. रस्त्यांवरील अपघात, रेल्वे अपघात तर जनतेच्या पाचवीलाच पुजले आहेत. विकास आणि प्रगतीच्या गोष्टी आम्ही करतो, पण रेल्वे यंत्रणा साफ भंगारात गेली आहे. सिग्नल यंत्रणा, तडे गेलेले रूळ, वेळापत्रक सुविधा यांची बोंब असताना राज्यकर्ते ‘बुलेट ट्रेन’च्या नावाने दांडिया खेळतात याचे आश्चर्य वाटते. हा जनतेच्या जिवाशी खेळ आहे. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेत बावीसवर लोकांचे प्राण गेले. अंधेरीत रेल्वेचा फूटब्रिज कोसळून लोकांचे प्राण गेले. लोकल ट्रेनमधून लटकणारे प्रवासी, रूळ ओलांडणारे लोक मोठ्या प्रमाणात मरत आहेत. देशात शेकडो ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघात होतात. मग रेल्वेचे खाते म्हणून

जो काही पसारा

आहे, त्याचे नक्की काय चालले आहे? प्रश्न फक्त मुंबई उपनगरीय रेल्वेचा नाही, तर बेफिकीर रेल्वे मंत्रालयाचा आहे. संरक्षण खात्याचे मंत्री असोत नाहीतर रेल्वे खात्याचे, ते खरोखरच गांभीर्याने त्यांचे खाते सांभाळत आहेत काय? कुणाला कुठेतरी कामधंद्याला चिकटवून टाकायचे अशा पद्धतीने महत्त्वाच्या खात्यांवर मंत्री म्हणून लोकांना चिकटवले आहे. त्यांचा सारा वेळ पक्षाची वकिली करण्यातच जातो. एखादा मोठा रेल्वे अपघात होतो, त्यानंतर रेल्वेमंत्री राजीनामा देऊन दुसऱ्या खात्यात बदलून जातो. हे परंपरेने चालले आहे. सुरेश प्रभू गेले, त्यांच्या जागी पीयूष गोयल आले. रेल्वेची सेवा सुरक्षित व शिस्तीत होईल असे सांगितले, पण कालचा गोंधळ बरा होता असे वाटावे इतकी परिस्थिती बिघडली. रेल्वे मंत्रालयाचे एक स्वतंत्र बजेट होते. मोदी सरकारने तेही काढून टाकले. श्रीमान गोयल नामक रेल्वेमंत्री हे कागदावर आहेत, पण रेल्वे रुळांवर आहे काय? ती लोकांना चिरडत आणि लटकवत निघाली आहे. मंत्र्यांचे होमवर्क कच्चे असते व कच्चे मंत्री फक्त धुरळा उडवतात. त्या धुरळ्यात असे अपघात घडतात. लोकांच्याही चुका आहेत. रेल्वे रुळांवर परवानगी न घेता अशी गर्दी करणे हे अपघातास आमंत्रण आहे. पंजाबचे मंत्री म्हणतात, हा अपघात म्हणजे नैसर्गिक आपत्ती आहे. असे सांगणे हा मूर्खपणा आहे. मानवी चुकांमुळे असा अपघात घडला. याला

राजकारणी, प्रशासन व जनताही

तितकीच जबाबदार आहे. हा अपघात काँग्रेसमुळे झाला की भाजपमुळे झाला यावर एकमेकांना दोष देऊन काय फायदा? गोरखपूरच्या सरकारी इस्पितळात प्राणवायूअभावी शंभर बालके दगावली ही मनुष्यचूक तशीच अमृतसरचा रेल्वे अपघात ही मनुष्यचूक आहे. रेल्वेने लोकांना चिरडले. त्या रेल्वेगाडीच्या चालकाचा तरी दोष काय? असे अपघात यापूर्वी झाले व यापुढेही होतील, पण सत्ताधारी मात्र बुलेट ट्रेनच्या धुंदीत जगत असतात. त्याच धुंदीचे हे बळी आहेत. दसरा सोहळ्यात झालेल्या भीषण अपघातानंतर 16 तासांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग अमृतसरला पोहोचले यावर राजकारण सुरू आहे. ‘‘आपण इस्रायलला रवाना होणार होतो. अपघाताच्या वेळी मी विमानतळावर आत पोहोचलो होतो. त्या ठिकाणाहून परतायला वेळ लागला’’ असा मुख्यमंत्र्यांचा खुलासा आहे, पण रेल्वे रुळांवर सांडलेल्या निरपराध्यांच्या रक्ताचे राजकीय शिंतोडे यापुढे बराच काळ उडत राहतील. जे मरण पावले त्यांच्याविषयी, त्यांच्या कुटुंबांविषयी संवेदना व्यक्त करण्याचा हा प्रसंग आहे. अमृतसर येथील दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी होईल. त्याने काय होणार? रामलीलेतील रावणदहनाचा सोहळाच अपघातास कारणीभूत ठरला. रावणाची भूमिका करणारा कलाकारही अपघातात मेला, पण त्याने अनेकांचे प्राण वाचवले. रावणाने पत्करलेल्या हौतात्म्याची तरी कदर ठेवा. नाहीतर अमृतसर, पाटणा, मुंबईप्रमाणे अपघात होतच राहतील. अमृतसरच्या रेल्वे रुळांवर जे घडले, त्या रक्ताळलेल्या ‘अच्छे दिना’च्या करुण किंकाळ्याच होत्या. त्यांचे अश्रू कसे पुसणार?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही लोकशाही आहे, तुम्ही म्हणालात म्हणून कोणीही दुर्योधन होत नाही !

News Desk

भाजप सध्या ‘भारतीय विरुद्ध काश्मिरी’ असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्नात !

News Desk

डिजिटल व्यवहारासंबंधी फसवणूकीवर बंदी घालण्यासाठी आरबीआयचे नवे नियम लागू

News Desk