HW Marathi
राजकारण

…तर मग तुम्हाला माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज काय ?

नवी दिल्ली | “मी पंतप्रधान म्हणून अपयशी ठरलो असेन तर मग तुम्हाला माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज काय ?”, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केला आहे. पंतप्रधान मोदी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. मोदींनी यावेळी पुन्हा एकदा विरोधकांची महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याचे म्हटले आहे. “महाआघाडीचा घराणेशाही पुढे नेण्याचा प्रयत्न तामिळनाडूसह देशातील जनता यशस्वी होऊ देणार नाही”, असा विश्वास देखील मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी यावेळी राफेल मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर जोरदार टीका केली. “काँग्रेसने संरक्षण क्षेत्रात अनेक घोटाळे केले, आपल्या जवळच्या लोकांना कंत्राटे दिली, जमिनीपासून आकाशापर्यंत भ्रष्टाचार केला. मात्र भाजपचा कारभार हा भ्रष्टाचारमुक्त आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट्राचाराचा परिणाम देशाच्या संरक्षण सामर्थ्यावर झाला”, असा आरोप देखील यावेळी मोदींनी केला.मात्र मोदींनी यावेळी राज्यातील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमुकवर टीका करणे कटाक्षाने टाळले आहे.

Related posts

नांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली सभा ?

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

News Desk

आमच्यात आता मतभेद नाहीत, एकत्र येऊन रॅली काढावी ठाकरेंचे विरोधकांनी आव्हान

News Desk