HW News Marathi
राजकारण

मला मौलाना आझाद असे म्हणायचे होते, चुकून मोहम्मद अली जीना बोलून गेलो !

नवी दिल्ली | देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान आहे, अशी मुक्ताफळे काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी उधळली आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर सर्व स्तरातून शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, “मला मौलाना आझाद असे म्हणायचे होते, परंतु मोहम्मद अली जिना चुकून बोलून गेलो,” असे सिन्हा म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा यांनी काल (२६ एप्रिल) मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत बोलताना म्हणाले होते की, ‘काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जिना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे,’ असे भाषणादरम्यान म्हणाले होते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जिना यांची स्तुती केली होती. काँग्रेस हा जिना यांचा पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या विकासात त्यांचाही सहभाग आहे असे सिन्हा यांनी म्हटले होते. ‘काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारले खायला दिल्यासारखे होते, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले होते.

Related posts

गडचिरोलीत मतदान करून परतणाऱ्या मतदारांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

News Desk

बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

News Desk

शिवसेनेचा स्वतंत्र गट करण्यासाठी 12 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; एकनाथ शिंदेंची माहिती

Aprna