HW News Marathi
राजकारण

…जेव्हा गिरीश महाजन गरबा खेळतात

मुंबई | भाजपाचे डॅशिंग आणि उत्साही नेते म्हणून ओळखले जाणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा लेझीम खेळतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला होता.पण आता चक्क गिरीश महाजन यांनी गुरुवारी नवरात्रीनिमित्त आयोजित गरब्यात ठेका धरला होता . त्यांचा गरबा सध्या सोशल मीडिया वर प्रचंड वायरल होत आहे.

देशभरात नवरात्रौत्सव साजरा केला जात असून यानिमित्त ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ‘नमो रमो दांडिया’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात गुरुवारी गिरीश महाजन हे देखील सहभागी झाले होता. दरम्यान, भाजपाच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची जागा धोक्यात ही बातमी म्हणजे सोशल मीडियावरील टाइमपास असून त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.

गरब्याची गाणी सुरु होताच महाजन यांची पावले थिरकू लागली आणि काही क्षणातच महाजन, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार हे तिघेही चक्क गरबा खेळू लागले होते आणि हिंदी गाण्यांवर या तिघांची पावले थिरकली. भाजपाचे मंत्री आणि आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख हरवून बसला आहे !

News Desk

भाजपचे हे ‘टगे’ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आता शहाणपणा शिवतात! – संजय राऊत

Aprna

आण्णा हजारेंचे चंद्रकांत दादांना पत्र

swarit