HW News Marathi
राजकारण

कोण आहेत राष्ट्रवादीचे ३१ प्रवक्ते ?  

नाशिक | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल ३१ प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांच्यासह तीन प्रदेश प्रवक्ते आणि २७ जिल्हा प्रवक्त्यांचा यात समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

नाशिकचे आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण आणि संजय खोडके यांच्याकडे प्रदेश प्रवक्ते तर सुरज चव्हाण यांना प्रवक्ता समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या यादीत ८ नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. तसेच लोकसभा मतदार संघनिहाय जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्याही फेररचना केल्याचे पहायला मिळत आहे.

अशी आहे जिल्हानिहाय प्रवक्त्यांची यादी

मुंबई – विद्या चव्हाण, राहुल नार्वेकर, चित्रा वाघ, क्लाईड क्रास्टो, अदिती नलावडे, महेश चव्हाण, डॉ.दलवाई.

पुणे – अंकुश काकडे, चेतन तुपे, जयदेव गायकवाड, विकास लवांडे, विजय कोलते, भूषण राऊत

ठाणे – आनंद परांजपे, महेश तपासे

औरंगाबाद- सुरजितसिंग खुंगर, नीलेश राऊत, उमर फारुकी.

अकोला – डॉ.आशाताई मिरगे. नाशिक- विश्वास ठाकूर, डॉ. पवार.

बीड – उषा दराडे, अमरसिंह पंडीत

उस्मानाबाद- सक्षणा सलगर सोलापूर – उमेश पाटील

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी आता पप्पू राहिले नसून गप्पू झाले आहेत !

News Desk

शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम तातडीने जाहीर करा !

News Desk

अखेर शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची माफी मागितली

News Desk