मुंबई | आगामी निवडणूक आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीचा तिढा देखील आता लवकरच सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप-सेनेच्या युतीबाबत आज (१८ फेब्रुवारी) संध्याकाळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: BJP President Amit Shah and Shiv Sena Chief Uddhav Thackeray will address a joint press conference later today. An announcement on the alliance will be made in the press conference today. (file pic) pic.twitter.com/Nd9amzkvb2
— ANI (@ANI) February 18, 2019
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपची युती होणार कि नाही ? युती झाली तर मोठा भाऊ कोण ठरणार ? याबाबत राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले होते. या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे आज संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत मिळतील. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढणार असून विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी १४४ जागा लढणार असल्याची माहिती विश्वस्त सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेसाठी भाजप पालघरची जागाही सोडण्यास तयार झाले असून शिवसेना-भाजपमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परंतु, अधिकृत घोषणा ही आज संध्याकाळी होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.