HW News Marathi
राजकारण

आंध्रची विधानसभा स्टॅच्यू ऑफ युनिटीला टक्कर देणार का?

हैदराबाद | राजकारण म्हटलं की त्यात कुरघोडीही आलीच आणि त्यातही विरोधक हा जवळचा असेल तर मग त्याची खैरच नसते. सध्या भाजपाला एनडीएतील घटक पक्षच विरोध करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत असून विरोध करत आहे तर तेलगू देसम पार्टीने काडीमोड घेऊन भाजपाला प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचा विडाच उचलला आहे.

भाजपावर नाराज असलेले चंद्राबाबू नायडू यांनी आधी सीबीआयला राज्याचे दरवाजे बंद करुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले होते आणि आता गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पेक्षाही उंच आंध्र प्रदेश विधानसभेची इमारत बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे विधानसभेची नवीन इमारत बांधली जाणार असून याची उंची २५० मीटर इतकी असणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची १८२ मीटर असून जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून याची नोंद झाली आहे. त्यामुळे भाजपा आणि प्रामुख्याने केंद्र सरकारवर कुरघोडी करण्यासाठीच चंद्राबाबू नायडू यांनी हा निर्णय घेतला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

नोव्हेंबरच्या अखेरीस यासंदर्भातील निविदा काढण्यात येतील आणि यानंतर दोन वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असेल. या इमारतीत दोन गॅलरी असतील. यातील पहिली गॅलरी ही ८० मीटरवर असेल. तिथे ३०० लोकांना उभं राहता येईल. तर दुसरी गॅलरी ही २५० मीटर उंचीवर असेल. तिथे २० लोकांना थांबता येईल. या दोन्ही गॅलरीमधून अमरावतीचे विहंगमय दृष्य दिसेल, असे सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ मुंबई सरचिटणीस पदी रतन अस्वारे यांची नियुक्ती

News Desk

मीच नव्हे तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा शिवसेनेत गटात प्रवेश

Aprna
देश / विदेश

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास उघड का करता येणार नाही ?

News Desk

मुंबई | ‘भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास का उघड करता येणार नाही ?’, असा सवाल उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना विचारला आहे. त्याचप्रमाणे, याबाबतचे स्पष्टीकरण ४ डिसेंबरपर्यंत एका प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालायने पुणे पोलिसांना दिले आहेत. उच्च न्यायालयाने भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्यातपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले होते. मात्र, सरकारी वकिलांनी या प्रकरणाचा तपास उघड करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाला सांगितले.

उच्च न्यायालयात गौतम नवलखा, तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गौतम नवलखा यांच्याविरोधात तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे आहेत. मात्र, स्टेन स्वामी आणि तेलतुंबडे यांच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे नाहीत ज्यामुळे त्यांना अटक करता येईल. म्हणूनच पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नसून ते केवळ संशयित आहेत, असे सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे.

पुणे पोलिसांनी देशभरात छापे टाकून भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ५ जणांना अटक केली होती. वरावरा राव, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, गौतम नवलखा, व्हर्नोन गोन्साल्विस या पाच जणांना पोलिसांनी अटक केले होते.

Related posts

#Article370Abolished : सरकारचा ‘हा’ निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्याविरोधात !

News Desk

पवार विरोधी पक्षात असते तर त्यांनी ढोंगीपणा आणि नाटकं केली असती !

Arati More

सरकारी बँकांचं खासगीकरण, SBI सह देशातील अनेक बँकांचे कर्मचारी २ दिवसांच्या संपावर

News Desk