HW News Marathi
राजकारण

उर्मिला मातोंडकर काँग्रेसमधून बाहेर पडणार ?

मुंबई | काँग्रेसवर नाराज असलेल्या अभिनेत्री उर्मिला मांतोडकर या लवकरच काँग्रेसला राम राम ठोकणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. उर्मिला यांनी लोकसभेत झालेल्या आपल्या पराभवाचे खापर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर फोडले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उर्मिला मातोंडकर यांना पराभव पत्करावा लागला. आपल्याला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचे म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी मिलिंद देवरा यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार देखील केली. याच पार्श्वभामीवर उर्मिला या आता काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार असून त्यांना अनेक अन्य पक्षांमधून ऑफर असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

“मी ही निवडणूक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, कष्ट घेतले. मात्र, मला पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित मदत मिळाली नाही”, असे उर्मिला यांनी आपल्या पत्रात म्हटल्याची माहिती मिळते. स्थानिक नेते विशेषत: संजय निरुपम यांच्या समर्थकांमुळे आपल्याला हा पराभव पत्करावा लागल्याचा थेट आरोप उर्मिला यांनी केला. तसेच, उर्मिला यांनी चुकीचे नियोजन, स्थानिक नेत्यांची पात्रता, अपुरी आर्थिक मदत अशाही अनेक बाबींचा देखील उल्लेख आपल्या पत्रात केला आहे. या पत्रात उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्या काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छे..छे..झुकली रे झुकली, आशिष शेलारांचा शिवसेनेवर जोरदार निशाणा

News Desk

तेजबहादूर यादव यांची वाराणसीची उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव

News Desk

“मविआ’चा प्रयोग फसला म्हणणे म्हणजे राजकीय अज्ञान”, शरद पवारांचा विरोधकांना टोला

Aprna