HW News Marathi
राजकारण

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला व बालविकास विभागाचा घेतला आढावा

मुंबई।  महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी  काल (१७ ऑगस्ट) महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक घेतली.

या बैठकीस प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त राहुल महिवाल,  एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, बाल हक्क आयोगाचे सदस्य सचिव उदय जाधव, राजमाता जिजाऊ मिशनचे संचालक संजीव जाधव उपस्थित होते.

यावेळी मंत्री लोढा यांनी विभागाचे विविध उपक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवावे आणि त्याचा लाभ राज्यातील अधिकाधिक महिला व बालकांना व्हावा, याबाबत सूचना केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या निधी चौधरींना निलंबित करा !

News Desk

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

मनसेने भाजपला सोडवायला दिली ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका

News Desk